तरुण भारत

फायझर-बायोएनटेक कंपन्यांवर सायबर हल्ला

ऑनलाईन टीम / बर्लिन : 

अमेरिकेची औषध कंपनी फायझर आणि जर्मनीची कंपनी बायोएनटेक या कंपन्यांवर सायबर हल्ला झाला असून, कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात डेटा हॅक झाला आहे. या कंपन्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Advertisements

या दोन्ही कंपन्यांनी एका पत्रकात म्हटले आहे की, इएमए सर्व्हरवर स्टोर फायझर आणि बायोनटेकची कोरोना लस, बीएनटी 162 बी 2 शी संबंधित काही दस्तावेज अवैधरित्या एक्सेस केले गेले आहेत. लसीच्या अभ्यासात समावेश असलेल्या कोणत्या लोकांची माहिती चोरी झाली आहे, यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही.

इएमएने हल्ल्याची माहिती देण्यास नकार दिला असून, सायबर हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. इएमएचा तपासासंदर्भात आणखी माहिती मिळण्याची वाट पाहत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

Related Stories

जॉर्जियातील फेर मतमोजणीत बायडेन विजयी

datta jadhav

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडले : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Rohan_P

आयर्लंड लॉकडाऊनमध्ये

Omkar B

जग फिरून चिमुकला करतोय मोठी कमाई

Amit Kulkarni

हवाई दलाचे C-17 गुजरातमध्ये दाखल; 120 भारतीयांची सुटका

datta jadhav

भारतापुढे पाकिस्तानची घाबरगुंडी

Patil_p
error: Content is protected !!