तरुण भारत

कर्नाटक: अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव घेण्यावरून सभागृहात गोंधळ

बेंगळूर/प्रतिनिधी

विधान परिषद अध्यक्षांविरोधात सत्ताधारी पक्षाच्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसवरून विधानपरिषदेमध्ये खळबळ उडाली. सत्ताधारी भाजपने नोटीस अजेंड्यात समाविष्ट करण्याची मागणी केली पण अध्यक्षांनी नियमांचा हवाला देऊन असे करण्यास नकार दिला. कार्यवाही सुरू होताच अध्यक्ष प्रतापचंद्र शेट्टी यांनी सहकारमंत्री एस.टी. सोमशेखर यांना कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडण्यास सांगितले.

दरम्यान, भाजप सदस्य अयानूर मंजुनाथ यांनी सभापतींविरोधात अविश्वास ठरावाबाबत सभागृहाच्या ११ सदस्यांनी नोटीस दिली आहे. नियमानुसार सभापतींनी या नोटीसचा अजेंडावर समावेश करावा कारण ही नोटीस देऊन आज १४ दिवस पूर्ण होणार आहेत. यावेळी मंजुनाथ यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेस सदस्यांनी निषेध केला. यावेळी काँग्रेस सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करत सभागृहात गोंधळ घातला.

विरोधी पक्षनेते एस.आर. पाटील, एम. नारायणस्वामी, बी. के. हरिप्रसाद यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक सदस्यांनी मंजुनाथ यांच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला. यासंदर्भात भाजपा आणि कॉंग्रेस सदस्यांमध्ये जवळपास अर्धा तास खडाजंगी सुरु होती. त्यावेळी श्रीनिवास यांनी सदस्यांनी नियमांनुसार नोटीस दिल्याचा युक्तिवाद केला. १४ दिवस गेले असल्याने सभापतींनी या सूचनेचा अजेंडावर समावेश करावा, असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

‘अनादर राउंड’ चित्रपटाने इफ्फीला सुरुवात

triratna

शेतकरी संघटनेचे आज राज्यव्यापी आंदोलन

Amit Kulkarni

बारावी विज्ञान विभागाच्या प्रयोग परीक्षा पुढे ढकलल्या

Patil_p

बेंगळूर विद्यापीठाच्या आवारातील जंगलात भीषण आग

triratna

बेंगळूर: तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून बीबीएमपीकडून १४ बालरोग तज्ज्ञांची समिती स्थापन

triratna

आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत

Rohan_P
error: Content is protected !!