तरुण भारत

अजिंक्यताऱयावर आघोरी प्रथेचा प्रकार उघकीस

किल्ल्यावर बकऱयाची कातडी, हळदीकुंकू अन् शिजवलेला भात

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

किल्ले अजिक्यताऱयांवर गुरुवारी सकाळी शिवभक्तांना दक्षिण दरवाजाच्या बाजूला महलाला लागून असलेल्या दाट झाडीत अघोरी प्रथेचा प्रकार बकऱयाच्या कातडीवरुन निदर्शनास आला. तसेच तेथे हळदीपुंकू, लिंबू, शिजवलेला भात असे आढळून आल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या किल्याच्या संवर्धनासाठी जिह्यातील हजारो शिवभक्त झटतात त्याच किल्यावर असला प्रकार होत असल्याचा खेद व्यक्त केला जावू लागला आहे. दरम्यान, अंनिसच्या पदाधिकाऱयांनी याठिकाणी भेट देवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

किल्ले अजिंक्यताऱयावर दररोज सकाळी साताऱयातील फिरायला जाणारे, दुपारी चुकारीचे आणि संध्याकाळीही फिरायला जाणाऱयांची संख्या मोठी असते. किल्ले अजिंक्यताऱयावर आजही ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आढळून येतात. किल्याच्या संवर्धनासाठी अनेक दुर्गप्रेमी, शिवभक्त झटत आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी मंडळीकडून गडावर चुकीचे प्रकार करण्याचे काम सुरु असते. त्यातच काही दिवसांपूर्वी काही विघ्नसंतोषी मंडळींनी ऐतिहासिक चुन्याच्या घाण्याची मोडतोड केल्याचा प्रकार शिवभक्तांना माहिती पडल्यानंतर खेद व्यक्त केला.

गुरुवारी सकाळी काही शिवभक्त दक्षिण दरवाजाच्या बाजुने जात असताना तेथे असलेल्या महालालगतच्या दाट झाडीत पाहिले असता रंगीत-संगीत पार्टी झाल्याचे तेथे सापडलेल्या वस्तूंवरुन आढळून आले. याठिकाणी विटांची चूल होती. त्या चुलीतील विस्तव सकाळीही फुलत होता. विशेष म्हणजे झाडाला मृत बकऱयाची कातडी टांगलेली दिसत होती. ठिकठिकाणी हळद-कुंकू अन् शिजवलेला भात टाकल्याचा दिसत होता. त्यामुळे हा अघोरी प्रकार गडावर कोणी केला असेल?, गडावर रंगीतöसंगीत पार्टी कोणी केली असेल?, ज्या कोणी विघ्नसंतोषी मंडळींनी हा प्रकार केला त्याबद्दल साताऱयात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

वनविभागाने कठोर कारवाई करावी

सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. पुरोगामी जिल्हा आहे. ज्या साताऱयातून अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरु झाली. त्याच साताऱयात काळूबाईला बकरे आणि केंबडे देवून काळी जादू, करणीचे प्रकार केले जातात. तोच प्रकार आज अजिंक्यताऱयावर झालाय. पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या तरी देवरुषीच्या सांगण्यावरुन एखाद्या बकऱयाचा बळी देणं आणि स्वतःवर करणी झालेली आहे. काळी जादू झालेली आहे असं समजून असे घाणेरडे प्रकार केले जात आहेत. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. अंनिसची अशी मागणी आहे की वनविभागाने संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अशी अंनिसच्यावतीने प्रशांत पोतदार यांनी मागणी केली.

Related Stories

कराडात बुधवारपासून दुकाने उघडणार

Patil_p

वेणेगावचे तलाठी सापडतील का कुठे?

datta jadhav

सातार्डे येथे महिला पोलीस पाटीलला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

triratna

गगनबावडा तालुक्यात आणखी एक कोरोनाबाधित

triratna

लसीकरण वाढीसाठी कृतीयुक्त आराखडा तयार

Amit Kulkarni

भारत बंद मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – संपत पवार पाटील

triratna
error: Content is protected !!