तरुण भारत

ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने सहा वर्षीय बालकाचा अंत

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत पडल्याने या दुर्दैवी अंत झाला. ही घटना शिंगेवाडी ता.माढा येथे गुरुवारी सायं ५ वा. सुमारास घडली. शंकर पांडुरंग शिंदे असे मृत्य बालकाचे नाव आहे. गावातील नागरिक व नातेवाईकांच्या मदतीने विहिरीतील पाणी काढल्यानंतर पाच ते सहा तासांनी त्या बालकाचा मृतदेह व ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी पहाटे दोन वाजता शंकरचे शवविच्छेदन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार मृत शंकरचे वडील पाडुरंग यांनी नेहमीप्रमाणे आपले दिवसभराचे शेतीचे काम उरकुन ट्रॅक्टर विहिरीच्या बाजूला लावला होता. ट्रॅक्टर लावलेल्या ठिकाणची जमीन भुसभुशीत झालेली आणि पाणी दिले असल्याने ओलसर जमीन खचली आणि बाजूला उताराला असलेला ट्रॅक्टर अन् त्यावरील मुलगा थेट विहिरीत जाऊन कोसळला. शंकरच्या मृत्यूने शिंदे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावात शंकरच्या अशा दुर्दैवी मृत्यूची बातमी पसरताच गावात सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले. याबाबत मयत मुलाचे चुलते आकाश दत्तात्रय शिंदे यांच्या फिर्यादीवरुन कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद झाली आहे. पोलिस हवालदार पि.एस.दराडे अधिक तपास करीत आहेत.

Advertisements

Related Stories

आजारपणाला कंटाळून तरूणाची राहत्या घरात आत्महत्या

Abhijeet Shinde

कवठेगावाजवळ अपघात; कर्नाटकातील चार मित्रांचा मृत्यू

Sumit Tambekar

करमाळा शहरासह तालुक्यात ४७ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सोलापुरात आज 5 कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापुरात आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 6 जणांचा बळी

Abhijeet Shinde

सोलापूर : लॉकडाऊन… ‘पाठीवर मारा पण पोटावर मारु नका’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!