तरुण भारत

शिवाजी कॉलेजला 1 कोटी 89 लाखाचा पुरस्कार

प्रतिनिधी / सोलापूर

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास एक कोटी 89 लाखांचा स्टार स्टेटस पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडून शिवाजी कॉलेजचा सन्मान करण्यात आला.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर गेल्या ऑगस्टमध्ये शिवाजी कॉलेजकडून ऑनलाइन प्रेझेन्टेशन सादर करण्यात आले. त्यानंतर शिवाजी कॉलेजला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यार्थी व कॉलेजच्या विकासासाठी एक कोटी 89 लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील 3 वर्षांत पुरस्काराची रक्कम खर्च करता येणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये शिवाजी कॉलेजला स्टार पुरस्कार मिळाला होता. त्याचे योग्य व्यवस्थापन झाल्याने हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे. देशातील फक्त 11 महाविद्यालयांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

यानिमित्त कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शिवाजी कॉलेजचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गुणवत्तापूर्ण विद्यार्थी विकासासाठी काम केल्यानेच हा पुरस्कार मिळाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे. इतरही महाविद्यालयांनी अशा पुरस्कारांसाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात व त्यांच्या टीमचा सत्कार केला. यावेळी डॉ. एस. एच. गायकवाड, डॉ. एस. डी. देवकर, डॉ. आर. बी. भोसले, एस. एच. पाटील आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सोलापूर शहरात ३५ नवे कोरोना रूग्ण, दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

एसटी कर्मचा-यांचे 50 टक्के पगार

Abhijeet Shinde

करमाळा तालुक्यात कोरोना आकडेवारीत घट, नागरिकांत उत्साह

Abhijeet Shinde

आदमापूर येथे होणारा संत बाळुमामा भंडारा उत्सव रद्द

Abhijeet Shinde

संक्रांतीनिमित्त विठोबाच्या मंदिरात पाना फुलांची आकर्षक सजावट

Abhijeet Shinde

सोलापूर : मागणी करुनही जिल्ह्याला लसीचा कमी पुरवठा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!