तरुण भारत

सरपंच आरक्षण निवडणूकीनंतर निश्चित होणार

गोडोली / प्रतिनिधी

जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. मात्र काही जिल्ह्यात अद्यापही निवडणूक पुर्व सरपंच आरक्षण निश्चित झाले नसताना निवडणूक आयोगाने बिगुल वाजवला. यामुळे सरपंच आरक्षण निश्चित न झालेल्या सातारा जिल्ह्यात चांगल्याच वावड्या उठल्या आहेत.मात्र ग्रामविकास विभागाने निवडणूकीनंतर सरपंच आरक्षण निश्चित करण्यात येईल , असे पत्रक काढून संभ्रम दूर केला आहे.सातारा जिल्ह्यातील तब्बल ८७९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार असून सरपंच आरक्षण निवडणूकी नंतर निश्चित होणार आहे.

Advertisements

कोरोनाच्या संकटात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यातील काही जिल्ह्यात सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले तर काही जिल्ह्यात ते अद्यापही जाहीर झाले नाही. सातारा जिल्ह्यातील ही आरक्षण निश्चित न झाल्याने चांगल्याच वावड्या उठल्या होत्या.

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २ अनुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.काही जिल्ह्यात निवडणूक पूर्व सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारी रोजी ही निवडणूक तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

ग्रामविकास विभागाने दि.११ डिसेंबर रोजी एक आदेश जारी करीत जिथे सरपंच आरक्षण सोडत निघणे बाकी आहे. त्याठिकाणी होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीला स्थगिती दिली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत १५ जानेवारी नंतर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतीच्या दि.१५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण निश्चित होणार आहे. त्यामुळे बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे.

Related Stories

साताऱ्यात कुत्र्यांवर पुन्हा विषप्रयोग

datta jadhav

सातारा : कोरेगावातील गांजा तस्करीचे माळशिरस तालुक्यात उगमस्थान

Abhijeet Shinde

सातारा : बेकायदेशीरपणे देशी रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

Abhijeet Shinde

लामजमध्ये 128.3 मि.मी पावसाची नोंद

datta jadhav

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मध्ये आठ गावांचा सामावेश

Amit Kulkarni

नेहमीप्रमाणे रविवारी बाधित वाढ मंदावली

datta jadhav
error: Content is protected !!