तरुण भारत

मार्कंडेयमध्ये 27,215 क्विंटल साखर उत्पादन

वार्ताहर/ काकती

काही दिवसांपूर्वी काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून बेळगाव तालुक्यासह परिसरातील ठिकठिकाणी ऊस तोडणीस वेगाने प्रारंभ झाला आहे. कारखानाच्या कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱया गाडय़ा, ट्रक्टराच्या ऊस भरलेल्या ट्रॉलींची गर्दी वाढू लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisements

कारखान्याचे गाळपही समाधानकारक चालले असून प्रत्येक शिफ्टला सरासरी 1500 मेट्रीक टन गाळप होत असून 24 तासांत तीन शिफ्टमध्ये गाळपाचे कामकाज चालले आहे. प्रतिदिन 1900 क्विंटल साखरेचे उत्पादन होत आहे. शुक्रवार दि. 11 डिसेंबरपर्यंत 30470.746 मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे तर 27 हजार 215 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गेल्या वर्षीच गळीत हंगामाची तात्पुरती सुरुवात झाली होती. यामुळे तालुक्यात ऊस लागवडीकडे शेतकरी सभासदांचा कल वाढला आहे. येथील काकती, होनगा परिसरात देखील उसाचे क्षेत्र वाढत चालले असून ठिकठिकाणी तोड होत असून कामगारांच्या टोळ्य़ा कार्यरत झाल्या आहेत. या मजुरांची निवारा बनविण्यासाठीची लागबग सुरू झाली आहे. ऊस वाहतूक करणाऱया वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. परिणामी परिसरातील महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Related Stories

पृथ्वीराजचे बेळगावमध्ये जल्लोषी स्वागत

Amit Kulkarni

इमारत बांधकाम परवान्याचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Amit Kulkarni

कंग्राळीतील मराठी शाळेची इमारत होणार दुमजली

Omkar B

ऑनलाईन मासे विक्री योजना बारगळली

Patil_p

दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे सामुदायिक मौजीबंधन

Amit Kulkarni

योग्य खबरदारी हाच कोरोना व्हायरसचा उपाय

Patil_p
error: Content is protected !!