तरुण भारत

इस्राईलमध्ये 27 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात

ऑनलाईन टीम / तेल अवीव :

इस्राईलने कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अमेरिकेच्या फायझर कंपनीसोबत करार केला आहे. इस्त्राईलची राजधानी तेल अवीवपर्यंत या लसींचा पहिला लॉट दाखल झाला असून, 27 डिसेंबरपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Advertisements

नेतन्याहू म्हणाले, फायझर-बायोएनटेकची लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठीही योग्य आहे. ब्रिटननंतर, कॅनडा, बहरिन आणि अमेरिकेने या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. त्यानंतर इस्त्राईलने देखील फायझरकडून पहिल्या लॉटमध्ये 80 लाख डोस ऑर्डर केले आहेत. 

इस्राईलने लस ऑर्डर केली असली तरी देखील फायझरच्या लसीला  इस्राईलमध्ये वापरण्यासाठी आवश्यक नियामक परवानग्या मिळालेल्या नाहीत. तथापि, देशव्यापी पातळीवर लसीकरणाचे धोरण तयार करण्यात येत असून, 27 डिसेंबरला लसीकरणाला सुरुवात होईल.

Related Stories

टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज

Amit Kulkarni

ऑस्ट्रियात सुधारणा

Omkar B

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 73 लाखांवर

datta jadhav

अमेरिकेतील भारतीयांची दमदार कामगिरी

Patil_p

टिकटॉक, वी-चॅटवर बंदी घालण्याऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

datta jadhav

5 कोटी वर्षांपूर्वींची हरिण आताचा व्हेल मासा

Patil_p
error: Content is protected !!