तरुण भारत

‘ओयो’ची आगामी गुंतवणूक युरोपात होण्याचे संकेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

ग्राहकांना आपल्या पसंतीची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करुन देण्यासह अन्य सेवा देण्यात अग्रेसर असणारी कंपनी ‘ओयो’ येत्या काळातही आपला विस्तार वाढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून या अगोदर करण्यात आलेल्या गुंतवणुकीसोबत आणखीन जादाची गुंतवणूक करण्याचे ध्येय कंपनीने ऩिश्चित केले असल्याचे समजते. येत्या काळात युरोपमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीचे संस्थापक आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.

कंपनीने या अगोदर युरोपमध्ये जवळपास 35 ते 40 कोटी युरोची गुंतवणूक केली आहे. अशीच गुंतवणूक येत्या काळातही सुरु ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी गुंतवणूक ही प्रामुख्याने डाटा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स) यावर आधारीत असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय सनदी लेखाकार संस्थेची(आयसीएआय) नेदरलँडमधील शाखा आणि भारतीय डच आर्थिक गलियारा (आयडीएफसी)कडून आयोजित करण्यात आलेल्या इंडिया सिंपोजियम 2020 च्या कार्यक्रमात बोलताना अग्रवाल यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

Related Stories

‘विवो’ भारतात करणार 7500 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

कोरोनामुळे अ‍ॅमेझॉनला 7500 कोटींचा तोटा

datta jadhav

आदित्य बिर्लाचाही लवकरच आयपीओ येणार

Omkar B

अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे बेरोजगारीत वाढ

tarunbharat

स्वस्त आयातीमुळे देशी तेलाचे भाव घसरले

Patil_p

एल ऍण्ड टी नुकसानीत

Patil_p
error: Content is protected !!