तरुण भारत

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

प्रतिनिधी/ गोडोली

कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल शुक्रवारी अखेर वाजला. जिल्हय़ातील 879 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी होणार मतदान होणार असून त्याची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे. या ग्रामपंचायतीची मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी केली.

Advertisements

  एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील 1 हजार 566  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार होते. परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. डिसेंबर अखेर मुदत संपणाऱया व नव्याने स्थापित होणाऱया सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारीपर्यंत मागे  घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी रोजी होईल.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहिती ही श्री. मदान यांनी दिली.

Related Stories

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Abhijeet Shinde

सातारा : ‘त्यांच्या’ प्रामाणिकपणामुळे सव्वा चार लाखाचे सोने मिळाले परत

Abhijeet Shinde

सातारा : वेळ येथे साकारला पन्नास फुटी अश्वारुढ शिवरायांचा पुतळा

Abhijeet Shinde

१६ कोटीच्या इंजेक्शननंतरही पुण्यातील चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

दिव्यनगरीत अज्ञातांनी दुचाकी पेटवून दिल्या

Amit Kulkarni

विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

datta jadhav
error: Content is protected !!