तरुण भारत

बेळगावात ‘112’ सेवेचा आज शुभारंभ

पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिकांसाठी आता एकच क्रमांक

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या सेवेसाठी आता देशभरात एकच क्रमांक असणार आहे. ‘112’ या क्रमांकावर संपर्क साधल्यावर सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत. रविवारी बेळगावात या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आतापर्यंत कर्नाटकातील सहा जिह्यांत ही सेवा सुरू असून बेळगाव हा सातवा जिल्हा ठरणार आहे.

यापूर्वी पोलीस दलासाठी 100, अग्निशामक दलासाठी 101, रुग्णवाहिकांसाठी 108 क्रमांकावर संपर्क साधावा लागत होता. आता एक देश एक आपत्कालीन क्रमांक या धर्तीवर 112 क्रमांक एकच असणार आहे. राज्यातील कोठूनही या क्रमांकावर संपर्क साधल्यावर थेट बेंगळूरला कॉल जातो व बेंगळूरहून सर्व सुत्रे हलविली जातात.

24 तास ही सेवा उपलब्ध असणार आहे. बेंगळूर येथे संपर्क साधल्यानंतर फोन कोठून आला याची माहिती संबंधितांना देवुन तातडीने मदत पोहोचविण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी बेळगाव शहरात 15 होय्सळ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या हस्ते रविवारी सकाळी या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

खास करुन महिला व मुलांना त्वरीत मदत पोहोचविण्यासाठी ही नवी व्यवस्था असणार आहे. जीपीएस व्यवस्थेवर आपत्कालीन सेवा तातडीने पुरविण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारीत ही सेवा असून रविवारपासून बेळगावातही या सेवेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर क्रमांक बंद होणार आहेत.

Related Stories

1 नोव्हेंबर रोजी तालुक्मयात कडकडीत हरताळ

Patil_p

एम. के. हुबळीत धाबा मालकाचा खून

Amit Kulkarni

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी 30 रोजी कोल्हापुरात धरणे आंदोलन

Amit Kulkarni

पहिली भूमिगत कचराकुंडी एसपीएम रोडशेजारी

Amit Kulkarni

शेतकऱयांना माती परीक्षण कार्डचे वितरण

Omkar B

बुडाला जमिनी देण्यास शेतकऱयांचा विरोध

Patil_p
error: Content is protected !!