तरुण भारत

बेळगाव परिसरात पुन्हा थंडीला सुरुवात

कमाल तापमान 30.6 तर किमान तापमान 14.8 अंशावर

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

गेल्या काही आठवडय़ांमध्ये हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावादेखील झाला आहे. या बदलत्या हवामानामुळे थंडी गायब झाली होती. उष्म्यामध्ये वाढ होत असताना मागील दोन दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. शनिवारी बेळगाव तालुक्मयात कमाल तापमान 30.6 तर किमान तापमान 14.8 अंशांवर येऊन पोहोचले आहे. यामुळे काहीशी थंडी जाणवताना दिसत आहे.

मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी कमी झाली होती. पण आता पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी आलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ढगाळ वातावरण आणि जोराचा वारा होता. त्यामुळे थंडीचा पारा 7 अंशांपर्यंत घसरला होता. मात्र, त्यानंतर ढगाळ वातावरण कायम राहिल्यामुळे थंडी कमी झाली.

दरवषी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात जोराची थंडी पडत असते. मात्र, किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पुन्हा थंडी वाढु लागली आहे. पहाटेच्या वेळीही थंडीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत चालले असून सध्या खऱया अर्थाने थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. या थंडीमुळे पुन्हा उबदार कपडे, कानटोप्या, हातमोजे आदींचा वापर करावा लागणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी ही थंडी लाभदायक असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. या हंगामातील पिकांना थंड वातावरण अपेक्षित असते. मात्र, लहरी हवामानामुळे पिकांनादेखील फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आता थंडी पडली तरच रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. रब्बी पिकांबरोबरच काजू व इतर पिकांनाही थंडीचा फायदा होणार आहे. सध्या ढगाळ वातावरण गायब झाले असून थंडी सुरू झाल्याने यापुढे तरी काही दिवस थंडी राहणे आवश्यक आहे.  

Related Stories

लॉकडाऊन नाहीच ; स्वतःची काळजी स्वतःच घ्या !

Patil_p

सोमवारी 232 नवे रुग्ण तर 182 जण झाले बरे

Amit Kulkarni

तीन दिवसांनंतरही शहर-तालुक्मयाच्या बऱयाच भागात वीजपुरवठा खंडित

Patil_p

सौम्या हुली यांचे दिवाणी न्यायाधीश परीक्षेत यश

Amit Kulkarni

हिंडलग्यात भाग्यश्री कोकितकरांना वाढता पाठिंबा

Patil_p

‘आजादी का अमृतमहोत्सव’अंतर्गत रॅली

Amit Kulkarni
error: Content is protected !!