तरुण भारत

अमेरिकेत फायजरच्या कोरोना लसीला मंजुरी

24 तासांत पहिली लस टोचली जाणार असल्याचे ट्रम्प यांचे विधान : वाढत्या संसर्गादरम्यान दिलासादायक घडामोड

अमेरिकेत फायजर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला शनिवारी आपत्कालीन वापरासाठी अनुमती मिळाली आहे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने ही मंजुरी दिली आहे. अमेरिकेबरोबरच मेक्सिकोनेही या लसीच्या आपत्कालीन वापराला हिरवा कंदील दाखविला आहे. ब्रिटन आणि कॅनडाने यापूर्वीच हे पाऊल उचलले आहे.

Advertisements

एफडीएकडून आपत्कालीन मंजुरी मिळाल्यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आज खरोखरच माझ्याकडे अत्यंत चांगली बातमी आहे. अमेरिकेने वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडवून आणला आहे. आम्ही केवळ 9 महिन्यांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी लस तयार केली आहे. विज्ञानाच्या इतिहासात हे अत्यंत उत्तम यश आहे. यामुळे लाखो लोकांचे जीवन वाचविता येणार असून लवकरच ही महामारी देखील संपणार आहे. एफडीएने फायजर लसीला मंजुरी दिल्याचे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय. फायजर आणि अन्य कंपन्यांना प्रचंड आर्थिक मदत केली असून हे त्याचेच फळ आहे. लसीची वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेत 24 तासांपेक्षाही कमी कालावधीत पहिली लस टोचली जाणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

लसीवर विश्वास ठेवा : बायडेन

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नागरिकांना लसीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. वैज्ञानिकांकडून कुठल्याही राजकीय प्रभावाशिवाय लस विकसित करण्यात आल्याचे ते म्हणाले. एफडीए आयुक्त डॉ. स्टीफन हॅन यांच्यावर लसीला मंजुरी देण्यासंबंधी व्हाइट हाउसकडून दबाव असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी भूमिका मांडली आहे. लसप्रकल्पावर कुठल्याही प्रकारचा राजकीय प्रभाव नाही. या प्रकल्पात सामील सर्व वैज्ञानिक गुणवत्तावान आहेत. ते यासंबंधी आवश्यक वेळ घेत असून सर्व महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष देत आहेत. वैज्ञानिकांनी निरंतर कार्याद्वारे आम्हाला या टप्प्यापर्यंत आणले आहे. सद्यकाळातील आव्हाने सर्वांनाच ज्ञात आहेत. परंतु आगामी काळ चांगला असेल, असे माझे मानणे आहे. लस विकसित करणाऱया संस्था, संशोधकांचे आम्ही आभारी आहोत. लसीची सुरक्षा आणि दक्षतेचे मूल्यांन करणाऱया तज्ञांचेही आभार मानतो असे उद्गार बायडेन यांनी काढले आहेत.

मेक्सिकोतही लस

मेक्सिकोतही फायजर-बायोएनटेक कंपनीच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य नियामकाने अनेक दिवसांच्या परीक्षणानंतर या लसीचा वापर आपत्कालीन स्थितीत करता येणार असल्याचे निश्चि केले आहे. त्याचमुळे आम्ही याचा वापर सुरू करत आहोत. मोठय़ा प्रमाणावर लसीकरण कधी सुरू होईल याविषयी लवकरच माहिती दिली जाणार आहे. काही आवश्यक पावले उचलावी लागणार असून लवकरच यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Stories

जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश

datta jadhav

उत्तर आफ्रिकेतील अल कायद्याचा प्रमुख ठार, फ्रान्सची कारवाई

datta jadhav

तहाव्वूर राणाचा जामीन अर्ज अमेरिकन न्यायालयाने फेटाळला

datta jadhav

आणखी एका देशात सत्तांतराचा प्रयत्न

Patil_p

ज्यूंच्या धार्मिक स्थळावर अमेरिकेत हल्ला

Patil_p

कोलंबिया, पेरूमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 8 लाखांचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!