तरुण भारत

‘हॅमर’च्या मदतीने राफेल अधिकच घातक

डोंगरामागील शत्रूला नष्ट करण्याची क्षमता : स्काल्प क्रूज क्षेपणास्त्राचे फ्रान्समध्ये यशस्वी परीक्षण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारतीय वायुदलात समाविष्ट राफेल लढाऊ विमान आता शत्रूला नष्ट करण्यासाठी सज्ज आहे. या लढाऊ विमानासाठी वायुदलाने विशेष शस्त्रयंत्रणा ‘हॅमर’ची मागणी केली असून त्याची फ्लाइट टेस्ट पूर्ण झाली आहे. हॅमर म्हणजेच हायली एजाइल अँड मॅनोवरेबल म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हे शस्त्र जीपीएसशिवाय स्वतःच्या लक्ष्याचा शोध घेत ते नष्ट करू शकते.

दक्षिण-पश्चिम फ्रान्समध्ये या क्षेपणास्त्राच्या 1,000 किलो वजनाच्या आवृत्तीची राफेलसह फ्लाइट टेस्ट करण्यात आली आहे. राफेलवर बसविण्यात येणारे हे दुसरे अवजड क्षेपणास्त्र ठरणार आहे. सुमारे 1,200 किलो वजन असलेले स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रही राफेलमधून डागता येणार आहे. हे क्षेपणास्त्रही भारतात येणाऱया राफेल विमानांच्या ताफ्यात समाविष्ट असणार आहे.

मोठा मारक पल्ला

हॅमर क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 20 ते 70 किलोमीटरपर्यंत असू शकतो. म्हणजेच  लाँच एअरक्राफ्ट (ज्या विमानातून क्षेपणास्त्र डागण्यात येते) शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या नजरेत पडत नाही. संबंधित क्षेत्र कसेही असले तरीही क्षेपणास्त्र स्वतःचे लक्ष्य शोधून काढते.. कमी उंची आणि डोंगराळ भागातही स्वतःचे लक्ष्य हुडकून काढण्याचे प्राविण्य या यंत्रणेत आहे. चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर याची तैनात करण्यात येणार आहे. हे एखाद्या दिशानिर्देशित क्षेपणास्त्र तसेच बॉम्बप्रमाणेही काम करते. मॉडय़ुलर वेपन असल्याने त्याला डागण्यासाठी विशेष व्यवस्थेची गरज नाही. क्षेपणास्त्राला उपग्रह, इन्फ्रारेड सीकर आणि लेझरद्वारेही दिशानिर्देशित केले जाऊ शकते.

गरजेनुरुप बदल

हॅमर वेपन किटला विविध आकारांच्या बॉम्बसह जोडले जाता येणार आहे. हे क्षेपणास्त्र 125 किलो, 250 किलो, 500 किलो आणि 1000 किलो बॉम्बसोबत डागले जाऊ शकते. 1000 किलोच्या आवृत्तीच्या क्षेपणास्त्राची फ्लाइट टेस्ट झाली असून त्याच्याद्वारे शत्रूचे खंदकही नष्ट करता येणार आहे. हे क्षेपणास्त्र क्राँकिटच्या अनेक मीटर जाडीला पृष्ठभागाला उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रामुळे राफेलचे सामर्थ्य वाढणार आहे.

राफेलमध्ये 6 हॅमरची क्षमता

हॅमरला एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठीही वापरता येणार आहे. याचा देखभालीचा खर्चही अधिक नाही. डाटा लिंकची क्षमता तसेच लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी आवश्यक लवचिकताही याच्यात आहे. राफेल या लढाऊ विमानात 250 किलोंच्या 6 हॅमर क्षेपणास्त्रांना एकाचवेळी तैनात करता येते.

Related Stories

एम. के. हुबळीत सायकलवरून मृतदेह नेण्याचा प्रकार

Patil_p

बेंगळूर: खेळाडूंसाठी दोन दिवसीय कोरोना लसीकरण मोहीम

Abhijeet Shinde

बेंगळूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वीर सावरकर उड्डाणपुलाचे उद्घाटन

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Abhijeet Shinde

झाकलेल्या चेहऱयामागील न लपणारा आरोग्यदूत !

Patil_p

मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारचे नेतृत्व करतील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!