तरुण भारत

पेडणे तालुक्यातील चारही मतदारसंघात 70 टक्केपेक्षा कमी मतदान

पेडणे  /( प्रतिनिधी )

पेडणे तालुक्मयातील मोरजी ,धारगळ ,हरमल व तोरसे या चार जिल्हा पंचायत निवडणुकीत  63  ते 69  टक्के मतदान झाल्यामुळे भाजपला अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागण्याची शक्मयता आहे .

सरकारच्या विरोधात कमी टक्केवारी मतदान झाल्यामुळे लोकप्रतिनिधी दुपारपर्यंत चिंतीत होते . मात्र दुसऱया सत्रात टक्केवारी वाढत होती त्यामुळे दोन्ही आमदार दयानंद सोपटे आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर  सुस्कारा सोडला ,कोणत्या ठिकाणी कमी मतदान सकाळी सत्रात झाले ते मतदान वाढवण्यासाठी आमदार दयानंद सोपटे व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जातीने समर्थकांकडे संपर्क करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यास मदत केली .

 ड़ मांदे मतदार संघातील मोरजी आणि हरमल या जिल्हा  पंचायत मतदार  संघात काही गावातील बुथवर 70 ते 80  टक्के मतदान झाले तर पेडणे मतदार संघातील धारगळ व तोरसे या मतदार संघातील काही गावात 65  ते 75 टक्के मतदान झाले .

  चारही मतदारसंघात   शांततेत मतदान

पेडणे तालुक्मयातील  चारही  जिल्हा पंचायत मतदार संघात शांततेत मतदान झाले. कोणताही अनुसूचित प्रकार घडला  नसल्याची माहिती  पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली. दळवी   यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला  होता .

टक्केवारी घटली  , भाजपला धक्का बसण्याची शक्यता 

पेडणे तालुक्मयातील मतदारसंघात  हरमल 69ज्ञ् ,    मोरजी   63. 73 ज्ञ्   ,धारगळ 55ज्ञ् ,  तोरसे 63ज्ञ्  असे मतदान झाल्याने  चारही   मतदार संघात 70 टक्केपेक्षा कमी मतदान झाल्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्मयता आहे .

भाजपा ,मगो व अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी  लढत  झाली. मोरजी ,हरमल ,तोरसे या मतदार संघातून अनुक्रमे सतीश शेटगावकर रंगनाथ कलशावकर व भारती सावळ या उमेदवारांनी मगो भाजपा व  काँग्रेस उमेदवाराला घाम काढलेला आहे .

Related Stories

प्रकाश नाईक यांच्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा

Patil_p

शासक आणि नागरिक कसे असावेत हे दाखवणारा “नमो” : दिग्दर्शक विजीश मणी

Shankar_P

सेझ जमिनी पुन्हा विकण्याचे सरकारचे षडयंत्र : चोडणकर

Amit Kulkarni

गोवा माईल्सवर तोडगा निघेना

Amit Kulkarni

कोरोनाला टक्कर देण्यास सरकार समर्थ

Omkar B

आजपासून खासगी बसगाडय़ा, सरकारी कार्यालये सुरू

Omkar B
error: Content is protected !!