तरुण भारत

खासदार शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा अभेद्य असा बालेकिल्ला राहिला आहे. त्याच बालेकिल्यात सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करणाऱया 80 वर्षाचे तरुण म्हणून ओळखले जाणारे खासदार शरद पवार यांचा वाढदिवस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात अभूतपूर्व सोहळय़ात साजरा करण्यात आला. आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅलीत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिह्यात अभिप्राय सर्वात जास्त नोंदणी केल्याने राज्यात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले.

Advertisements

मुंबई येथे खासदार शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्ताने व्हर्चूअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीमध्ये राज्यभरातील 36 जिह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जोडली गेली होती. त्यामध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहातून सकाळी 10 वाजताच सहभागी झाली होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना केक भरवण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे महिला जिल्हाध्यक्षा संमिद्राताई जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कविता म्हेत्रे, जयश्री पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक डॉ.राजेंद्र सरकाळे, फलटणचे शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकला. सहकार क्षेत्राला पवारसाहेबांच्यामुळेच उभारी आली. सहकाराला खऱया अर्थाने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवारसाहेबांचेच पाठबळ मिळाले. पवारसाहेबांचे जनतेवर अपार प्रेम आहे हे त्यांनी केलेल्या कामांमधून दिसून येते. त्यांना जिल्हा वासियांच्यावतीने खुप खुप शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय कामकाज करत असताना पवारसाहेबांकडून प्रशासनावर कशी पकड असायची. आमच्यासारख्या अधिकाऱयाला त्यांचे सतत पाठबळ मिळायचे. त्यांच्या प्रेमामुळे प्रशासकीय सेवेत काम करताना कसलीही अडचण आली नाही. विकासात्मक धोरणे राबवण्यात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच राहिल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा राष्ट्रवादीचा राज्यात गौरव

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिप्राय नोंदवा अभियानात सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त अभिप्राय नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामध्ये तब्बल 80 हजार जणांनी अभिप्राय नोंदवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Related Stories

जिल्हा बँकेत राजर्षी शाहूंना अभिवादन

Abhijeet Shinde

कोरोनाला रोखणारा खरा योद्धा ‘कवी माधव पवार’

Abhijeet Shinde

मृत्युनंतर ‘त्याने’ फेडले आई-वडिलांचे कर्ज !

Abhijeet Shinde

सातारा : राजवाडा-नगरपालिका रस्त्याचे डांबरीकरण

datta jadhav

सातारा : पाऊस सुरु असेपर्यंत पंचनामे सुरूच ठेवावेत

Abhijeet Shinde

राधानगरी अभयारण्यास मिळणार लोगोतून नवी ओळख

Abhijeet Shinde
error: Content is protected !!