22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना घेराव घातल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक ही कारवाई करत आहे.

मुगल रोड डुगरान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर  सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. दरम्यान, डुगरानपरिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरून शरण येण्याची संधी दिली. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. जवानांनी घेरलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक स्थानिक आणि दोन पाकिस्तानी दहशतवादी आहेत.

Related Stories

देशात चाचण्यांचा वेग वाढला; एकूण संख्या 15 कोटीच्या पुढे

pradnya p

मोठी बातमी ! यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या बंद पडलेल्या सेवा पुन्हा सुरू

triratna

दिल्लीत एकाचा मृत्यू; 607 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

चीनच्या माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण

Patil_p

कोरोना संकटात बिहारमध्ये रणधुमाळी

Patil_p

देशात 2.25 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!