तरुण भारत

रत्नागिरी : नांदगावात सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू


प्रतिनिधी / खेड :


तालुक्यातील नांदगाव – मोहल्ल्यातील दोन सख्ख्या भावंडांचा जगबुडी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अबरार आरिफ कादरी (९), जियाद आरिफ कादरी (६) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisements


हे दोघेजण शेळ्या चारण्यासाठी जगबुडी नदीकिनारी गेले होते. जियाद हा नदीकिनारी गेला असता अचानक त्याचा तोल जावून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी अबरार तेथे गेला असता त्याचाही पाय घसरून नदीपात्रात पडला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले. सायंकाळी उशिरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांसह ग्रामस्थांनी शोध मोहीम हाती घेतली.


सायंकाळी उशिरा या दोघांचे मृतदेह जगबुडी नदीकिनारी तरंगताना आढळले. होडीच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . त्यांच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Related Stories

रत्नागिरी : हुतात्मा अनंत कान्हेरे पुतळा चौकाला चढला नवा साज

Abhijeet Shinde

कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजारानजीक

NIKHIL_N

आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात ‘बनावट’ वेबसाईट

Patil_p

रत्नागिरीत दोन मुलींचे फेसबुक अकाऊंट हॅक

Patil_p

खाडीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन जोरात

NIKHIL_N

कृषि अभ्यासक्रम प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!