तरुण भारत

तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीच्या हालचाली गतिमान

युवराज पाटील/ सांबरा

तालुक्यात सध्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असून नागरिकांमध्ये भाऊबंदकी, ईर्षा व वर्चस्वाची लढाई उफाळून वर आली आहे. गावागावात हीच परिस्थिती असून यामुळे नागरिकांत कटुता निर्माण होण्याची संभावना निर्माण झाली आहे. इच्छूक उमेदवार ईर्षेने ग्राम पंचायत निवडणुकीत सहभाग घेताना दिसून येत आहे. मात्र निवडणूक झाल्यानंतर ईर्षेने वॉर्डातील विकास कामही करणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारण्यात येत आहे. वास्तविक पाहता ग्राम पंचायत सदस्य म्हणजे वॉर्डातील नागरिकांचा लोकप्रतिनिधी  असतो. तेथील नागरिकांच्या समस्या सोडविणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणे, गावामध्ये विकास कामावर भर देणे व भ्रष्टाचार रोखणे हे ग्राम पंचायत सदस्यांचे मुख्य कार्य असते. मात्र सध्या याच्या विपरीत होतानाचे दिसून येत आहे. काही अपवाद वगळता निवडून येईपर्यंत विविध आश्वासने देणारा ग्राम पंचायत सदस्य निवडणुकीनंतर पाचवर्षे नागरिकांना कुठे दिसतही नाही, अशी परिस्थिती सध्या अनेक गावामध्ये आहे. निवडणूक आली की अमुक करतो तमुक करतो अशी आश्वासने द्यायची व निवडणूक झाली की स्वत:चा स्वार्थ साधायचा अशी अवस्था गावागावामध्ये आहे. काही अपवाद वगळता बऱयाच सदस्यांचे पाच वर्षात साधे ग्राम पंचायत कार्यालयात दर्शनही दुर्मिळ असते, सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या सदस्यांनी गावागावामध्ये ग्राम पंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनविली आहे. त्यासाठी नागरिकांना अनेक भूलथापाही देण्यात येत आहेत. योग्य उमेदवारांला निवडणुकीला बसायला द्यायचे नाही यासाठी कटकारस्थानेही रचण्यात येत आहेत. त्यामुळे गावचा विकास कसा होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ग्राम पंचायत सदस्य हा नागरिकांचा लोकप्रतिनिधी असल्याने त्याने वारंवार आवाज उठवून नागरिकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. केवळ पद प्रतिष्ठेसाठी ग्राम पंचायत निवडणुकीला न बसता सामान्यांच्या काय समस्या आहेत. त्या ग्राम पंचायतीमध्ये मांडल्या पाहिजेत, तरच या पदाचा अर्थ सार्थक होईल. यंदाच्या निवडणूकीत तरुणांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे. गावच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेले अनेक तरुणही यंदाच्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये उतरले आहेत. त्यामुळे गावागावामध्ये रंगतदार लढती पहावयास मिळणार आहे. सध्याच्या ग्राम पंचायत निवडणुकीत बसणाऱया उमेदवारांला त्याचे ध्येय काय आहे. निवडून आल्यानतंर काय करणार? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने उमेदवाराला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisements

निवडणूक वेगळी नाते वेगळे

कोणतीही निवडणूक ही मर्यादीत कालावधीसाठी असते तर नागरिकांशी असलेले आपले नाते हे कायम टिकून राहते. यासाठी निवडणुकीमुळे आपापसात वैरत्वाची भावना न आणता किंवा ईर्षा न करता प्रत्येकाने प्रेमभावाने समाजात राहणे गरजेचे आहे, असा सूर सध्या नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

Related Stories

मराठा समाज मंडळातर्फे मनोहर बिर्जे यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

शिरहट्टी येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी

Patil_p

विविध मागण्यांसाठी बेळगुंदी येथील तरुणांचे आरोग्य केंद्राला निवेदन

Patil_p

हलगाजवळ अपघातात चालक जखमी

Amit Kulkarni

शहापूर परिसरात एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे पाणीच पाणी

Amit Kulkarni

बेळगाव विभागाचा बारावीचा निकाल 59.7 टक्के

Rohan_P
error: Content is protected !!