तरुण भारत

बेन्नाळीत गळफासाने दोघांची आत्महत्या

प्रेम प्रकरणाचा संशय, काकती पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेन्नाळी, ता. बेळगाव येथे केवळ अर्ध्या तासात दोघा जणांनी आत्महत्या केली आहे. सेवा रस्त्याशेजारील झाडाला गळफास घेऊन एका युवकाने आपले जीवन संपविले असून या घटनेनंतर अर्ध्या तासाने त्याच गावातील एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रविवारी सायंकाळी या घटना घडल्या. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकाच्या आत्महत्या प्रकरणाचा पंचनामा सुरू असतानाच त्याच गावातील महिलेने आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना समजली.

शिवाजी भीमा गाडीवड्डर (वय 31) रा. बेन्नाळी या युवकाने सेवारस्त्याशेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले. यासंबंधीची माहिती समजताच जयश्री राजू गाडीवड्डर (वय 35) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी व जयश्री दोघे विवाहित आहेत. या दोघांचे सूत जुळले होते. याची माहिती शिवाजीच्या घरात समजल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला समज दिली होती. थोडय़ाच वेळात त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर केवळ अर्ध्या तासात जयश्रीनेही आत्महत्या केली आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

शहर परिसरात होळी पारंपरिक पद्धतीने

Patil_p

बेळगुंदीत बुधवारी सकाळी 10 पर्यंत संचारबंदी

Patil_p

अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करा

Amit Kulkarni

कोविशिल्ड लस बागलकोटला दाखल

Amit Kulkarni

राष्ट्राच्या उभारणीत सीए व्यवसायाचे योगदान महत्त्वाचे

Amit Kulkarni

मच्छे संभाजीनगरातील समस्या सोडवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!