तरुण भारत

2022 युवा विश्व चषक क्रिकेट स्पर्धा पात्रता प्रक्रियेत बदल

वृत्तसंस्था/ दुबई

विंडीजमध्ये 2022 साली होणाऱया आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता फेरीच्या स्पर्धा प्रक्रियेमध्ये फेरबदल करण्यात आला असून या पात्रता स्पर्धेमध्ये एकूण 33 संघांचा समावेश राहील. पात्रता फेरीतील सामने पाच ठिकाणी खेळविले जातील. या आगामी आयसीसीच्या स्पर्धेत भारत, अफगाण, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाक, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, विंडीज आणि झिंबाब्वे हे संघ यापूर्वीच पात्र ठरले आहेत.

आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या पुरूषांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद विंडीज भूषविणार आहे. 2022 च्या सुरूवातीला या स्पर्धेला प्रारंभ होईल. 2020 साली झालेल्या या स्पर्धेतील पहिले 11 संघ 2022 च्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जगातील कोरोना महामारी समस्येमुळे 2022 च्या स्पर्धेसाठी खेळविली जाणारी पात्र फेरीची स्पर्धा एक वर्षांच्या कालावधीसाठी लांबली गेली आहे. जून 2021 पासून पात्र फेरीच्या सामन्यांना प्रारंभ केला जाणार आहे. आफ्रिका आणि आशिया विभागातील संघांची संख्या अधिक असल्याने पात्रता फेरीचे सामने दोन विभागात खेळविले जातील. आफ्रिका विभाग-2 मधील पात्र फेरीचे सामने टांझानिया येथे येत्या जून महिन्यात खेळविले जाणार असून यामध्ये यजमान टांझानिया, बोट्स्वाना, केनिया, रवांडा, मोझांबिक आणि सिरालिओनी या संघांचा समावेश राहील. त्याचप्रमाणे पात्र फेरीचे काही सामने नायजेरियामध्ये खेळविले जाणार आहेत.

Related Stories

आयपीएलमधील युवा यष्टीरक्षकांसाठी धोनी प्रेरणास्थान

Patil_p

भारताला विराटच्या गैरहजेरीचा फटका बसेल

Omkar B

वर्ल्डकपसाठी ‘संकट’, आयपीएलसाठी ‘संधी’!

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक हेच माझे पुढील लक्ष्य

Patil_p

कोरोनामुळे BCCI कडून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

prashant_c

ऐश्वर्य तोमर, चिंकी यादवला सुवर्णपदके

Patil_p
error: Content is protected !!