तरुण भारत

सांगली : काळू बाळू लोकनाट्यचे संचालक लोककलाकार संपत खाडे यांचे निधन

सांगली / प्रतिनिधी


तमाशा सम्राट काळू बाळू यांचे पुतणे, काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचे संचालक, मालक संपतराव शामराव खाडे (55) यांचे कवलापूर (ता. मिरज) येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मीक निधनाने लोककला क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.


तमाशासम्राट काळू बाळू यांच्यासोबत आणि त्यांच्या नंतरही संपतराव यांनी या फडाची धुरा सांभाळली होती. हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासूनच काळू बाळू लोकनाट्य तमाशात आपली कला दाखवत रसिकांना चकीत केले होते. या फडाच्या वाटचालीत त्यांचे खुप मोठे योगदान होते. काळूबाळू यांच्यानंतर त्यांनीच या फडाच्या व्यवस्थापनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती यशस्वी करुन दाखवली होती. अखेरपर्यंत त्यांनी ही जबाबदारी हिमतीने पार पाडली.


त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता कवलापूर (मळ्यात) येथे होणार आहे.

Related Stories

साईदत्त को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

triratna

सांगली : उपमहापौरांसह भाजपचे नऊ नगरसेवक गायब

triratna

राजर्षी शाहूंच्या जलनीती नुसार बंधारे बांधल्यास सांगलीचा महापुर धोका टळू शकतो

triratna

रूपाली खोत मृत्यू प्रकरण : संशयित आरोपीस कठोर शासन व्हावे

triratna

शिक्षक परिषदेचे विविध मागण्यांसाठी लेखाधिकाऱ्यांकडे साकडे

triratna

जिल्हय़ात नवे 25 पॉझिटिव्ह रूग्ण

triratna
error: Content is protected !!