तरुण भारत

आगामी 4 ते 6 महिन्यात कोरोनाचा प्रकोप; परिस्थिती अधिक गंभीर होणार

  • बिल गेट्स यांनी दिला इशारा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 


जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. यासोबतच सर्व देशांचे कोरोना लसीचे संशोधन युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच  मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना, आगामी 4 ते 6 महिन्यात कोरोनाचा प्रकोप वाढणार असून आणखी चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल असा इशारा दिला आहे.

Advertisements


गेट्स यांची ‘ बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ ही संस्था कोरोनाची लस विकसित करण्यात आणि ती जगभरात उपलब्ध करून देण्यासाठी सध्या कार्यरत आहे. अमेरिकेसारख्या देशात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, तेथील ही भयानक स्थिती पाहून बिल गेट्स यांनी हा इशारा दिला आहे. 


ते म्हणाले, मला वाटते अमेरिका या महामारी विरोधात अजून चांगल्या प्रकारे सामना करू शकते. गेट्स फाऊंडेशन लसी साठी संशोधन करत असलेल्यांना आर्थिक मदत करत आहे. पुढे ते म्हणाले येणार काळात कोरोनाची स्थिती अधिक वाईट होऊ शकते. आय एच एम आय च्या अंदाजनुसार, या काळात दोन लाखांपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. मात्र, मास्क घालणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. 


पुढे ते म्हणाले, अमेरिकेत आतापर्यंत 2 लाख 90 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा मी 2015 मध्ये भविष्यवाणी केली होती. त्यावेळी मृत्यू संख्या अधिक असणार असे भाकीत केले होते. त्यामुळे हा व्हायरस जितका घातक आहे. या सगळ्याचा परिणाम अत्यंत गंभीर आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Related Stories

धोनी सर्वात महान कर्णधार :पीटरसन

Patil_p

भारतीय कुशल उमेदवारांची कॅनडात जाण्याला पसंती

Patil_p

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार ?

Rohan_P

इस्त्राईल : संघर्ष महाकठीण

Patil_p

काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

Abhijeet Shinde

पॅकेजवरून राजकारण

Patil_p
error: Content is protected !!