तरुण भारत

जम्मू काश्मीर : पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला ; पीएसओचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पीडीपी नेत्याच्या घरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडीपी नेत्याच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा(पीएसओ) गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम राबवली जात आहेे.

Advertisements


मध्य काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील नाटीपोरा भागात सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी पीडीपी नेता हाजी परवेज अहमद यांच्या घरावर हल्ला केला. ज्यामध्ये त्यांचा खासगी सुरक्षा रक्षक मंजूर अहमद गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले असता, तिथे त्याचा मृत्यू झाला.


पीडीपी नेता परवेज यांनी सांगितले की, माझी मुले, वृद्ध आई आणि अन्य कुटुंबीय घरात होते. तेव्हा सकाळी तोंड बांधलेले दोन हल्लेखोर मुख्य दरवाज्यातून आत आले व त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. यानंतर माझ्या पीएसओकडून देखील गोळीबार सुरू करण्यात आल्यावर हल्लेखोरांनी पळ काढला. 

Related Stories

अनुराग ठाकुरांवर 72 तासांसाठी भाषणबंदी

prashant_c

किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्डा उध्वस्त; 25 जिलेटीन कांड्या हस्तगत

datta jadhav

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरून शुभेच्छा

triratna

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक

Patil_p

आसाममध्ये भूस्खलन; 20 जणांचा मृत्यू

datta jadhav

पद्मश्री डॉ. अशोक पानगडिया यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!