तरुण भारत

इचलकरंजी येथे अल्पवयीन युवतीची छेड काडणाऱ्या एकास अटक

प्रतिनिधी / इचलकरंजी

इचलकरंजी येथील एका अल्पवयीन युवतीची एकतर्फी प्रेमातून दुचाकीस्वारांनी पाठलाग करून तिची भर रस्त्यात अडवणूक केली. तिच्याशी अश्लील वर्तन करून तिला व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी दुपारी शहरातील गजबजलेल्या चौकात घडली. याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत एकतर्फी प्रेमातून पाठलाग करणारा व त्रास देणाऱ्या युवकाचा शोध घेऊन अटक केली.

सचिन संजय शिंदे (वय २०, रा. टाकवडे, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे तर त्याच्या मित्राचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. याबाबतची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे.

अल्पवयीन युवती शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आज कामानिमित्त घराबाहेर अडली असता संशयित सचिन शिंदे आणि त्याच्या अनोळखी मित्रांनी दुचाकीवरून पाठलाग केला. शहरातील गजबजलेल्या चौकात पीडित युवती आली असता तिला या दोघांनी अडवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत प्रेम नाही केलीस तर तुला आणि तुझ्या भावाला जीवे ठार मारणार, अशी धमकी दिली. हा प्रकार पीडिटेने नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घडल्या घटनेची गांभीर्याने दखल घेत एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीची छेडछाड काढणाऱ्या संशयिताचा शोध घेऊन अटक केली.

Advertisements

Related Stories

बदनामीची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

Abhijeet Shinde

जिल्हा परिषद विषय समितीमधील रिक्त पदांसाठी उद्या निवडणूक

Abhijeet Shinde

उदगांव पॅटर्न राज्यभर वापरण्यासाठी शेतकर्‍यांना प्रत्यक्षिके देणार – राज्य कृषी प्रधान सचिव

Abhijeet Shinde

आधुनिक महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण `शिल्पकार’ – शाहूकार डॉ. रमेश जाधव

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठात परीक्षेसंदर्भात अडचणींचा पाढा

Abhijeet Shinde

महात्मा ज्योतिबा फुले जन योजना गोरगरीबांसाठी वरदान ठरणार – आरोग्य मंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!