तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.54 %


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 17 लाख 61 हजार 615 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 93.54 % आहे. 

Advertisements


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,949 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 83 हजार 365 वर पोहचली आहे. सध्या 72 हजार 383 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 269 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.56 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 17 लाख 48 हजार 362 नमुन्यांपैकी 18 लाख 83 हजार 365 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 04 हजार 406 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 4 हजार 335 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

तौक्ते चक्रीवादळ मंदावले; पण मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Rohan_P

सोलापूर शहरात कोरोनाने चौघांचा मृत्यू, 38 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

सांगली : लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार शक्य

Abhijeet Shinde

चौका चौकात झळकले पोस्टर बॉईज; इच्छुकांच्या डिजिटल फलकांनी शहर व्यापले

Abhijeet Shinde

सुशांत आत्महत्या : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार म्हणाले…

Rohan_P

सातारा, कराडसह आठ पालिकांचा कार्यकाल संपला

Patil_p
error: Content is protected !!