तरुण भारत

कर्नाटक: ११ जानेवारीपासून गुलबर्गा ते तिरुपती विमान सेवा सुरु

बेंगळूर/प्रतिनिधी

११ जानेवारी २०२१ पासून स्टार एअर कर्नाटकमधील गुलबर्गा ते तिरुपती दरम्यान आठवड्यातून चार दिवस विमान सेवा सुरु करणार आहे.

गुलबर्गा ते तिरुपती दरम्यान दर सोमवारी, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी ही सेवा सुरु असेल. आठवड्यातून चार दिवस विमान उड्डाण करेल. एअरलाइन्सच्या माहितीनुसार तिकीट दर २ हजार असेल. एअरलाइन्सने सोमवारपासून काम सुरू केले आहे.

सकाळी ९.५५ वाजता गुलबर्गा येथून उड्डाण करेल आणि सकाळी ११ वाजता तिरुपती येथे उतरेल. परतीच्या प्रवासादरम्यान ती दुपारी २.५५ वाजता तिरुपतीहून सुटेल आणि दुपारी ३.३० वाजता गुलबर्गा विमानतळावर पोहोचेल.

Advertisements

Related Stories

कोरोना विषयावर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक

Abhijeet Shinde

बर्ड फ्लू : कर्नाटकमध्ये सहा मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी

Abhijeet Shinde

दहावी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल

Amit Kulkarni

एसएसएलसी परीक्षेच्या आयोजनाचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

Abhijeet Shinde

जीममध्ये 50 टक्के प्रवेश देण्याचा आदेश

Amit Kulkarni

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका दोन टप्प्यात?

Patil_p
error: Content is protected !!