तरुण भारत

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

इलेक्ट्रीक स्कूटर निर्मितीचा तामिळनाडूत मोठा कारखाना : 10 हजार जणांना नोकरी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisements

ओला कंपनी तामिळनाडूत इलेक्ट्रॉनिक स्कूटर्सच्या निर्मितीसाठी 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. जगातला हा सर्वात मोठा निर्मिती कारखाना करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

ओला कंपनी भाडेतत्वावर गाडय़ा ग्राहकांना पुरवत असते. आता ही कंपनी दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ओला कंपनी गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे मोठे हब भारत बनावा अशी अपेक्षा ओलाने व्यक्त केली आहे. नव्या कारखान्याकरीता तामिळनाडू राज्य सरकारसोबत एक करारही कंपनीने केला असून या कारखान्याच्या माध्यमातून 10 हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. भारतातलाच नव्हे तर जगातला सर्वात मोठय़ा क्षमतेचा हा कारखाना ठरणार असल्याचा दावा ओलाने केला आहे. याअंतर्गत वर्षाला 20 लाख स्कूटर्सची निर्मिती करण्याची क्षमता कारखान्याची असेल. ओलाचे चेअरमन व ग्रुपचे सीईओ भावीश अगरवाल यांनी आपल्या नव्या कारखान्याविषयी सांगताना अभिमान बाळगत ओला ही कंपनी आजच्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या दुनियेत स्वत:ची वेगळी उंची गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारत प्रगतीपथावर असून आपली कंपनीही यात आपले योगदान ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेतून देणार असल्याचा आपल्याला रास्त अभिमान आहे. जगामध्ये नावाजली जावी अशी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली निर्मिती प्रक्रियेसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्युच्च दर्जाच्या उत्पादनावर भर दिला जाणार असून जागतिक बाजाराची मागणी सदरचे उत्पादन पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

प्राप्तीकर परताव्याचे काम वेगाने

Amit Kulkarni

‘हिरोमोटो’ची विक्री प्रभावीत

Patil_p

लॉकडाऊनमध्ये पार्लेसह मॅगीलाही मोठी पसंती

Patil_p

शेअर बाजार पहिल्याच दिवशी कोसळला

Patil_p

आदित्य बिर्लाचाही लवकरच आयपीओ येणार

Omkar B

ऍमवेची 100 कोटींची गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!