तरुण भारत

सातारा नगरपालिका निवडणूकीत मनसे सर्व जागा लढविणार

प्रतिनिधी / गोडोली

“सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून येत्या निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व जागा लढवणार आहे. पालिकेच्या कारभाराबद्दल नागरिक हैराण असून सक्षम उमेदवार उभे करून सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे,”असे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

सातारा नगरपालिका निवडणूक सर्व जागा लढविण्यास वरिष्ठांनी आदेश दिले असून तशी तयारी सुरू केली आहे. पालिका सत्तेच्या सारीपाटावर फक्त दोन आघाड्या खेळत आल्या आहेत. शहराचा नाही तर नगरसेवकांचा विकास करणाऱ्या या पालिकेच्या कारभाराला नागरिक हैराण झाले आहेत. तिसऱ्या आघाडीची शक्यता वाटत नाही, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वार्डात उमेदवार उभे करून दोन्ही आघाड्यांना प्रबळ आव्हान असणार आहे.

“शहराच्या विकासासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांची गरज आहे. सामाजिक बांधिलकीतून शहरात सक्रिय असणाऱ्या महिला आणि निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवार दिली जाणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या कारभारावर नाखूष असणाऱ्या सातारकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिसरा पर्याय असणार आहे. सत्तेत आल्यावर खऱ्या अर्थाने सातारकरांची सत्ता प्रस्थापित होईल,”असे मत राहूल पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी दिलीप सोडमिसे, भरत रावळ, अझर शेख, गणेश पवार, चंद्रशेखर जोशी, अनिकेत साळूंखे, सागर पवार अर्जुन शिंदे, प्रशांत सोडमिसे, चैतन्य जोशी, समीर दोडमनी, अविनाश भोसले, जगदीश आवटे अविनाश दुर्गावळे, समीर गोळी आदी मनसैनिक उपस्थित होते.

Related Stories

बावधनमध्ये अजुनही अटकसत्र सुरूच

Patil_p

जिह्यातील सतरा पोलीस झाले फौजदार

Omkar B

वडूथ येथे कोव्हीड उपचार सेंटर उभारणी – आ.शशिकांत शिंदे

Patil_p

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंग निश्चित

Patil_p

पालिकेच्या समोरची गळती काढण्याचे दोन दिवसांपासून काम सुरु

Patil_p

साखळय़ा तोडण्याचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!