तरुण भारत

लुत्सी श्वानाच्या डोहाळजेवणाचे वाईच्या लेकीने केले सोपस्कार

पती अभिनेता राहुल कुलकर्णी, सासू, सासरे सर्वच कार्यक्रमात उत्साहाने झाले होते सहभागी

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

वाई शहर व सातारा जिह्याचे नृत्यामध्ये नाव करणारी शैला टिके सवृश्रृत आहे. तिने नुकतेच तिच्या सासरी अहमदनगर येथे लुत्सी या श्वानाच्या डोहाळजेणवाचा सोहळा अतिशय उत्कृष्ट नियोजन करुन पार पाडला.या सोहळय़ात शैला टिके यांचे पती अभिनेता राहुल कुलकर्णी, सासू, सासरे सर्वच सहभागी झाले होते. हिरव्या कपडय़ात लुत्सीला नटवून पाळण्यात बसवून तिला हळदकुंकू लावून तिची ओटी भरणही केली. तिच्यापुढे बर्फी आणि पेढयाचे ताट ठेवले असता लुत्सीने बर्फीला पसंती दिल्याने टाळय़ांचा कडकडाट झाला.

अलिकडच्या काळात काही चांगल्या जुन्या चालीरिती बंद पडू लागल्या आहेत. मग तेथे बारसे असो किंवा डोहाळजेवण. अशा कार्यक्रमामुळे नातेवाईक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होत असते. अलिकडच्या प्लॅट संस्कृतीत हे सारे हरवून गेलेले आहे. मात्र, वाईची कन्या, वाईची माहेरवासीन शैला. हिच्या सासरी अहमदनगर येथे तिने तिच्या घरी असलेल्या लुत्सी या श्वानाचे डोहाळजेवणाचा कार्यक्रमाचे नियोजन केले. अगदी घर फुलांनी सजवले. लुत्सीसाठी पाळणा आणला.जुन्या मंजूळ गाण्यांनी परिसर उल्हासित करुन टाकला होता. लुत्सीला पाळण्यात बसवून सवाष्ण महिलांनी औषण केले. लुत्सीसमोर पेढा आणि बर्फी ठेवली तेव्हा तिने बर्फीला पसंती दिली. त्याचवेळी सर्वांने तीचे टाळय़ा वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे डोहाळ जेवणाची मुख्य असलेल्या लुत्सीला हिरव्या कपडय़ात नटवण्यात आले होते. या अनोख्य़ा डोहाळ जेवणाची वाई तालुक्यात चर्चा सुरु असून परिसरातील महिलाही सहभागी झालेल्या होत्या. सौ.शैला टिके कुलकर्णी यांचे पती अभिनेता राहुल कुलकर्णी यांच्यासह सर्वच कुटुंबिय या सोहळयात आनंदाने सहभागी झाले होते.

स्पेशली प्लॅन केला नव्हता

लुत्सी प्रेग्नंट असल्याकारणाने आम्ही असा विचार केला की दरवर्षी तीचा वाढदिवस 23 जुलैला साजरा करतो. तिच्या प्रेंडलाही बोलवतो. मुंबईत अनेक प्रकारचे ब्रीड असतात. पार्टीला येतात. तशाच प्रकारचे डोहाळजेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. स्पेशली प्लॅन केले नाही. प्रत्येक सण ती आमच्यासोबत साजरा करते.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील कोरानामुक्त 1003 नागरिकांना डिस्चार्ज

Abhijeet Shinde

Oxygen Shortage:महाराष्ट्राच्या हितासाठी काहीही करायला तयार -राजेश टोपे

Abhijeet Shinde

सातारा : ग्रामसेवकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : घरफाळा घोटाळय़ावरून महापालिकेत खंडाजंगी

Abhijeet Shinde

मिरज : रोझावाडी येथील माजी उपसरपंचाचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

साखरी तळ्यावर अतिक्रमण करणायांवर कारवाई करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!