तरुण भारत

अन्यथा पदाधिकारी, अधिकरी, सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

प्रतिनिधी / सांगली

महापालिकेची महासभा थेट सभागृहात घ्यावी तसेच भूखंडांचे चाललेले बाजार थांबवावेत. अन्यथा यापुढे महापालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आला. कृती समितीच्या वतीने आज मित्रमंडळ चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

Advertisements

भूखंडांचा बाजार रोखावा तसेच महापालिकेची महासभा ऑनलाईन न घेता सभागृहात घ्यावी या मागणीसाठी आज सर्व पक्षीय कृतीसमितीच्या वतीने धरणे धरण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, शिवसेनेचे शंभूराज काटकर, कॉंग्रेसचे अमर निंबाळकर, भाजपचे अतुल माने, राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सुर्यवंशी यांनी आपला पाठिंबा दर्शवला. महापालिकेचे भूखंड भाड्याने कवडीमोल भाड्याने देणे, त्यावरील आरक्षणे उठविणे अशा भानगडी केल्या जात आहेत. हे विषय महासभेत घुसडून त्यांचा बाजार करण्यासाठी ऑनलाईन सभेचा फंडा सुरू आहे. हा सगळा बाजार रोखण्यासाठी महासभा थेट सभागृहात घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Stories

सांगली : सरपंच आरक्षणाची सोडत 29 रोजी : तहसीलदार सचिन लंगुटे

Abhijeet Shinde

सांगली : आरगेत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

मिरजेत रेल्वेखाली पडून ड्रायव्हरची आत्महत्या

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षणासाठी पंचायत समिती सदस्याचे अनोखे आंदोलन

Abhijeet Shinde

आरोग्य सेविकांना दमदाटी प्रकरणी दोघांवर गुन्हा

Abhijeet Shinde

पलूस तालुक्यात आज नवे ८ कोरोना बाधीत रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!