तरुण भारत

दहावीच्या परिक्षेत मार्क वाढवून देतो असे भासवून विद्यार्थ्याला २२ हजाराचा गंडा

विद्यार्थ्याने पैशांची मागणी केल्याने ठकसेनसह त्यांच्या टोळीकडून बेदम मारहाण

प्रतिनिधी / इचलकरंजी

कबनूर ( ता. हातकणंगले ) येथील एका विद्यार्थ्याला दहावीच्या परिक्षेत ऑनलाईन मार्क वाढवून देतो, असे भासवून एका ठकसेन युवकाने २२ हजाराचा गंडा घातला. फसगत झालेल्या संबंधीत विद्यार्थ्याने ठकसेनकडे पैशांची मागणी केली असता ठकसेनसह चार जणांच्या टोळीने विद्यार्थ्याला घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

ठकसेन प्रेम बाळासो पाटील त्यांचे साथिदार ओंकार दत्ता पाटील, सुमित नेमिनाथ देशमाने, अनिकेत जीवधर केटकाळे (सर्व रा. स्वामी मळा, इचलकरंजी ) या चार जणांविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधी कौस्तुभ कृष्णात गोते ( रा. परिट गल्ली , सनी कॉर्नर, कबनूर, ता. हातकणंगले ) याने फिर्याद दिली आहे. संशयीत चौघे जण गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, फिर्यादी कौस्तुभ गोते यांच्याबरोबर झालेल्या ओळखीतून संशयीत आरोपी ठकसेन प्रेम पाटील याने मी दहावीच्या परिक्षेमध्ये ऑनलाईन मार्क वाढवून देतो असे भासवून २२ हजार रुपये घेतले. पण परिक्षेत मार्क न वाढल्याने संबंधीत विद्यार्थ्याने सतत त्यांच्याकडे पैसांची मागणी करू लागला. त्यामुळे चिडलेल्या ठकसेनने आपल्या तिघा साथिदारांच्या मदतीने संबंधीत विद्यार्थ्याच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी संबंधीत विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी शिवाजीनगर पोलिसात ठाकसेन पाटीलसह त्याच्या तिघा साथिदारांच्या विरोधी तक्रार दाखल केली आहे .

Related Stories

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

पंचगंगा साखर कारखानास्थळावरील ऊस तोडणी मजूरांच्या झोपड्यांना आग

Abhijeet Shinde

प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम ताबडतोब खात्यावर जमा करा

Abhijeet Shinde

कोरोना रोखण्यासाठी रुग्ण सेवा देणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची – समरजितसिंह घाटगे

Abhijeet Shinde

शिरोळमध्ये बाहेरून येऊन खरेदी अथवा विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : संस्थात्मक विलिगिकरणासाठी गेलेल्या कुटुंबास रिसॉर्ट मालकाने केली शिवीगाळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!