तरुण भारत

जुगार खेळणाऱया 9 जुगाऱयांना अटक

माळमारुती पोलिसांची कारवाई : 8600 रुपये जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

अमननगर, उज्वलनगर जवळील रेल्वे रुळाशेजारी रात्रीच्या वेळी जुगार खेळणाऱया 9 जुगाऱयांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8 हजार 600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पवन अनिल पाटील, सुनील नारायण बाळेकुंद्री (दोघेही रा. रघुनाथपेठ, अनगोळ), रियाजअहम्मद महम्मदरफीक घीवाले (रा. नुराणी गल्ली, न्यू गांधीनगर), राहुल मनोहर हलगेकर (रा. उप्पार गल्ली-खासबाग), अमित राजाराम कांबळे (रा. नाथ पै सर्कल), मेहबुब निसारअहम्मद शिलेदार (रा. न्यू गांधीनगर), महम्मदशाहीद महम्मदरफी बाळेकुंद्री (रा. उज्वलनगर), शहारुख शमसुद्दीनअहम्मद कलईगार (रा. न्यू गांधीनगर), सोहेल अब्दुलसल्ला शेख (रा. आझादनगर, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सोमवारी रात्री वरील सर्व जण जुगार खेळत होते. याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धाड घालण्यात आली. या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Related Stories

कळसा-भांडुरासाठी शेतकऱयांचे पुन्हा आंदोलन

Patil_p

कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड परिसर

Patil_p

ता.पं.कार्यकारी अधिकारी रात्री शिकवितात तेंव्हा

Patil_p

मुख्यमंत्र्यांकडून मेदार समाजालाही पॅकेज जाहीर

Patil_p

हिंडलगा महालक्ष्मी यात्रा गाव मर्यादित करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

राज्यात सुविधांयुक्त 75 रुग्णालये उभारणार

Omkar B
error: Content is protected !!