तरुण भारत

बेननस्मित शाळेत शिक्षकांची कार्यशाळा

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार बेननस्मिथ शाळेमध्ये शहर आणि परिसरातील माध्यमिक शाळांमधील तृतीय भाषा हिंदी विषय शिक्षकांची कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी माहेश्वरी अंध शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे होत्या. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. मुख्याध्यापिका शैलजा गुंडी यांनी स्वागत केले.

शिक्षिका रबेका मनी यांनी प्रास्ताविक केले. फर्नांडिस यांनी प्रार्थना व बायबल वाचन केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी एन. आर. पाटील यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले व हिंदी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तुलसीदास संघाच्या उपाध्याक्षा शैला चाटे यांनी कार्यशाळेचा हेतू सांगितला.

कार्यशाळेत काही शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे विवरण करून चर्चा करण्यात आली. यावेळी रामचंद्र मगदूम यांनी प्रश्नपत्रिकेबाबत माहिती दिली. विनायक डिचोलकर व अनुराधा कुलकर्णी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन कल्पना अंमलात आणण्याचे सांगितले. भारती सौंदत्ती व हिंदी शिक्षक यावेळी उपस्थित होते. गजानन कांबळे यांनी आभार मानले.    

Related Stories

दुचाकी चोरणाऱया तरुणाला अटक

Rohan_P

लोकमान्यतर्फे गणेश भक्तांना आरती ऍपची भेट

Rohan_P

समुद्र स्नानासाठी किनाऱयावर भाविकांची गर्दी

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द येथील जुना पूल पुन्हा पाण्याखाली

Patil_p

अथणीत मुंबईहून आलेले 7 जण क्वारंटाईन

Patil_p

जितो लेडिज विंगतर्फे दिवाळी मिलन

Patil_p
error: Content is protected !!