तरुण भारत

भाजप राज्य कार्यकारिणीवर शरद केशकामत यांची निवड

खानापूर/वार्ताहर

खानापूर तालुक्मयातील भाजपचे ज्येष्ठ नेते शरद केशकामत यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र भाजप राज्य अध्यक्ष नलीन कटील यांच्या शिफारशीनुसार देण्यात आले आहे. सदर कार्यकारिणीत त्यांच्यावर उत्तर कर्नाटकातील पाच जिल्हय़ांची जबाबदारी राहणार आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Advertisements

 शरद केशकामत हे खानापूर तालुक्मयातील माडीगुंजी गावचे रहिवासी असून गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी खानापूर तालुक्मयात पक्ष संघटना बळकटीसाठी अथक परिश्रम केले आहेत. तालुक्मयात सामाजिक सेवा, आरोग्य शिबिरे व धार्मिक कामांमध्ये सहकार्याची भूमिका घेत आपली वेगळी छाप त्यांनी पाडली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भाजप राज्य कमिटीने त्यांच्यावर उत्तर कर्नाटकातील 5 जिल्हय़ांच्या विभागात पक्ष संघटना बळकटीसाठी जबाबदारी दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण पक्ष संघटनेसाठी प्रामाणिकपणे कार्य करत आलो आहे. या पुढेही पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ात संघटना बंधण्यासाठी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

रविवारी शहरात ‘ब्लॅक संडे’

Rohan_P

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केल्या अधिकाऱयांना सूचना

Patil_p

चिखले येथे दोन घरे फोडून दोन तोळे सोने – रोख रक्कम लंपास

Amit Kulkarni

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णची संख्या ४१ हजार पार ; २४ तासांत बेंगळूरमध्ये ४७ मृत्यू

Abhijeet Shinde

सुजय सातेरीचे शानदार दीडशतक, नितीनसह द्विशतकी भागीदारी

Amit Kulkarni

तिसऱया दिवशीही कोरोना रुग्णांचा दीडशेचा टप्पा पार

Amit Kulkarni
error: Content is protected !!