तरुण भारत

कक्केरीतील ‘त्या’ खुनामागे सासऱयाचाच हात असल्याचे उघडकीस

खानापूर / प्रतिनिधी

कक्केरीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका खुनामागे त्याच्या सासऱयाचाच हात असल्याची चर्चा सुरू होती. पण सासऱयाचे वय लक्षात घेता त्याच्याकडून असा प्रकार होणार नाही. असेही बोलले जात होते. पण या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपासात त्या खुनामागे सासऱयाचाच हात होता असे उघडकीस आल्याने पोलिसांनी त्या सासऱयाला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा खटला दाखल केला आहे.

Advertisements

कक्केरी येथील बिष्टाप्पा परसाप्पा कोनसकुंपी (वय 42) या शेतकऱयाचा झोपलेल्या ठिकाणी डोक्मयात वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्याच्या भावाने अज्ञातांनी खून केल्याची तक्रार नंदगड पोलीस स्थानकात दिली होती. बिस्टाप्पाचा सासरा हणमंतप्पा यल्लाप्पा अरेर (वय 75, मूळ मोगद ता. धारवाड सध्या रा. कक्केरी) याने दारूच्या नशेत हा खून केल्याची चर्चा दबक्मया आवाजात गावात सुरू होती. पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. हणमंतप्पा हा जावयाकडेच राहायला होता. त्याचे मुलगी व जावयासोबत क्षुल्लक कारणावरून वारंवार खटके उडत होते. त्यातच धारवाड येथे त्याच्या शेतात मळणी केलेले भात आणण्यासाठी त्याने जावयाकडे तगादा लावला होता. पण जावयाने मी खाली नसल्याचे सांगितले. यावरून त्यांचे जोरात भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून कक्केरी येथील मळणीच्या दिवशी शेतात बिस्टाप्पा एकटाच झोपलेला असताना लाकडाच्या दंडुक्मयाने डोक्मयात प्रहार करून खून केला. घरात हणमंतप्पा याचे रक्ताने माखलेले धोतर आणि खुनासाठी वापरण्यात आलेला दंडुका पोलिसांनी जप्त केला आहे. मंडल पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी या प्रकरणाचा छडा लावला.

सासऱयाच्या खाण्या-पिण्याचे त्रास ओळखून बिस्टाप्पा यांने हणमंतप्पा याला आपल्या घरी ठेवून घेतले होते. दोन महिन्यापूर्वी त्यांनी केलेल्या मारहाणीत जावयाचा हात मोडला होता. पण जावयाने सासऱयाच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केले होते. हेच दुर्लक्ष त्याला महागात पडले.

Related Stories

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे दुर्गादेवी मंदिरात दीपोत्सव

Amit Kulkarni

जिल्हय़ातील आणखी 22 जण कोरोनामुक्त

Patil_p

ता.पं.मधील सकिंग मशीनचा वापर कधी होणार?

Patil_p

सीडी प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम नाही

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यात दुसऱया दिवशी 364 अर्ज दाखल

Patil_p
error: Content is protected !!