तरुण भारत

महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

6 मार्च ते 3 एप्रिल 2022 मध्ये होणाऱया स्पर्धेत भारताची सलामी पात्र संघाविरुद्ध

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

आयसीसीने 2022 मध्ये होणाऱया महिलांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले असून भारतीय महिलांची सलामीची लढत 6 मार्च 2022 रोजी न्यूझीलंडमधील टॉरँग बे ओव्हल येथे पात्रता फेरीतून आलेल्या संघाविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडमधील सहा पेंद्रांवर यातील सामने खेळविले जातील.

पात्रता फेरीतून आलेल्या संघांविरुद्ध भारताचे आणखी दोन सामने 12 व 22 मार्च 2022 रोजी हॅमिल्टनमध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील सामने राऊंड रॉबिन पद्धतीने होणार असून एकूण 8 संघांचा त्यात सहभाग असेल. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारत व इंग्लंड यांच्यातील लढत टॉरँगमध्ये 16 मार्चला होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत ऑकलंडमध्ये 19 मार्च रोजी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत ख्राईस्टचर्चमध्ये 27 मार्च 2022 रोजी खेळविली जाणार आहे.

आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणार होती. पण कोरोना महामारीच्या संकटामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती. आधी ठरलेल्या केंद्रावरच नवीन वेळापत्रकानुसार सामने खेळविले जाणार असून 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर होणारी महिलांची ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल. ऑकलंड, टॉरँग, हॅमिल्टन, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च व डय़ुनेडिन या सहा केंद्रांवर यातील सामने खेळविले जातील. ‘आपणा सर्वांनाच एका खडतर वर्षाला सामोरे जावे लागले आहे. पण आमच्या आवडत्या खेळात पुन्हा सहभागी होता येणार आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो,’ असे भारतीय कर्णधार मिताली राजने म्हटल्याचे आयसीसीच्या पत्रकात देण्यात आले आहे. ‘गेल्या तीन-चार वर्षात भारतीय संघाने आयसीसीच्या स्पर्धांत चमकदार प्रदर्शन केले आहे. आम्ही जर 2022 ची स्पर्धा जिंकली तर पुढील पिढीच्या मुलींसाठी ते यश खूप प्रेरणादायक ठरणारे असेल. वनडे क्रिकेट सर्वोच्च मानले जात असल्याने प्रत्येक खेळाडू त्यात ठसा उमटवण्याचाच प्रयत्न करीत असतो. या स्पर्धेची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत,’ असेही मितालीने म्हटले आहे.

या वेळापत्रकानुसार वेलिंग्टनमधील बेसिन रिजर्व्ह व ख्राईस्टचर्चमधील हॅगले ओव्हल येथे उपांत्य सामने होतील तर 3 एप्रिल 2022 रोजी होणारी अंतिम लढतही ख्राईस्टचर्चमध्येच प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना टॉरँग येथे 4 मार्च रोजी यजमान न्यूझीलंड व पात्रता फेरीतून आलेला संघ यांच्यात होणार आहे. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द.आफ्रिका हे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले असून उर्वरित तीन संघ आयसीसी पात्रता स्पर्धेतून निवडले जाणार आहेत. पुढील वर्षी 26 जून ते 10 जुलै या कालावधीत ही पात्रता स्पर्धा लंकेमध्ये होणार आहे. 2022 मध्ये जागतिक दर्जाच्या दोन मोठय़ा स्पर्धा होणार असून महिलांची विश्वचषक स्पर्धा ही त्यातील पहिली तर इंग्लंडमध्ये होणारी राष्ट्रकुल ही दुसरी स्पर्धा असेल.

या स्पर्धेसाठी 5.5 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्स एकूण बक्षीस असून 2017 मधील बक्षिसापेक्षा ती 60 टक्क्याने जास्त आहे. 2013 मधील स्पर्धेच्या बक्षिसाचा विचार केल्यास ती तब्बल 1000 टक्क्यांनी जास्त आहे. यातील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून केले जाणार आहे. ‘महिला क्रिकेटने आता खूपच प्रगती केली असून अलीकडेच झालेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या यशातून ते प्रतिबिंबित झाले आहे,’ असे स्टार इंडियाचे प्रमुख संजोग गुप्ता म्हणाले.

या स्पर्धेत होणारे भारताचे सामने

तारीख            संघ                    केंद्र

6 मार्च 2022  भारत वि. पात्र संघ           टॉरँग

10 मार्च 2022                         भारत वि. न्यूझीलंड         हॅमिल्टन

12 मार्च 2022                         भारत वि. पात्र संघ          हॅमिल्टन

16 मार्च 2022                         भारत वि. इंग्लंड टॉरँग

19 मार्च 2022                         भारत वि. ऑस्ट्रेलिया       ऑकलंड

22 मार्च 2022                         भारत वि. पात्र संघ          हॅमिल्टन

27 मार्च 2022                         भारत वि. द.आफ्रिका       ख्राईस्टचर्च

30 मार्च 2022                         पहिल्या उपांत्य सामना    वेलिंग्टन

31 मार्च 2022                         दुसरा उपांत्य सामना       ख्राईस्टचर्च

3 एप्रिल 2022                         अंतिम लढत       ख्राईस्टचर्च.

Related Stories

जखमी वॅग्नरच्या जागी मॅट हेन्रीला संधी

Patil_p

विदेशी संघांचे न्यूझीलंड दौरे निश्चित

Patil_p

वेटलिफ्टर प्रदीप सिंग उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p

भारतीय महिला फुटबॉल संघाची घोषणा

Patil_p

भालाफेकमध्ये नीरज चोप्रा तिसऱया स्थानी

Patil_p

ओस्टापेन्को, हॅलेप, व्हेरेव्ह, नदाल तिसऱया फेरीत

Patil_p
error: Content is protected !!