तरुण भारत

देशात 26,382 नवे कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 26 हजार 382 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 387 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 लाख 32 हजार 548 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 44 हजार 096 एवढी आहे.

Advertisements

मंगळवारी दिवसभरात 33,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 32 हजार 002 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 94 लाख 56 हजार 449 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 15 कोटी 66 लाख 46 हजार 280 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 85 हजार 625 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.15) करण्यात आल्या. 

Related Stories

युपी : पूर नियंत्रण आणि महसूल राज्य मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

‘या’ लोकांना 28 दिवसातच मिळणार ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस

datta jadhav

वायू प्रदूषण चिमुकल्यांसाठी घातक

Omkar B

जुळय़ा अँडीबॉडीचा शोध

Patil_p

रामलल्लाच्या दर्शनाला प्रतिदिन लाख भाविक येणार

Omkar B

कोरोनाच्या प्रसाराला कुंभमेळा कारणीभूत नाही

Patil_p
error: Content is protected !!