तरुण भारत

उत्तराखंडात 496 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 496 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 83 हजार 502 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल 12,205 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 524 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 16, बागेश्र्वर 08, चमोली 17, चंपावत 13, देहरादून 177, हरिद्वार 18 नैनिताल 104 पौरी गरवाल 17, पिथोरगड 60, रुद्र प्रयाग 04, तेहरी गरवाल 13, यू एस नगरमधील 25 आणि उत्तर काशीमधील 24 जणांचा समावेश आहे. 

  • 75 हजार पेक्षा अधिक कोरोनामुक्त!


दिलासादायक बाब म्हणजे काल 524 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 75,049 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.88 टक्के इतके आहे. तर सध्या 6 हजार 089  रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

भाजपकडून 50 कोटी रुपये अन् मंत्रिपदाची ऑफर : उमंग सिंघार

datta jadhav

पोलीस ठाण्यात आढळली कोब्रा सापाची तब्बल 21 पिल्ले

datta jadhav

हैदराबाद विमानतळावर 11 प्रवाशांकडून जप्त केले 1.66 कोटींचे सोने

Rohan_P

पाकिस्तानकडून आगळीकींचा उच्चांक

Omkar B

पंतप्रधान मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार

Patil_p

बस दरीत कोसळून 14 जण ठार

Patil_p
error: Content is protected !!