तरुण भारत

अमेरिकेत महामारीचा कहर

मधूमेह, रक्तदाबाने होणाऱया मृत्यूंमध्ये वाढ

अमेरिकेत 2020 हे वर्ष मृत्यूच्या आकडेवारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत खराब ठरले आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून तेथे अन्य वर्षांच्या तुलनेत 3 लाख 56 हजार अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु सर्व मृत्यू थेट कोरोना महामारीशी संबंधित नाहीत. सर्वसाधारणपणे एक चतुर्थांश अधिक मृत्यू मधूमेह, अल्झायमर, अतिरक्तदाब, निमोनिया यासारख्या कारणांमुळे झाला आहे. यासंबंधीची माहिती सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

Advertisements

कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर भार पडला असून अन्य रुग्णांची पूर्वीसारखी देखभाल सध्या होत नाही. महामारीमुळे अनेकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा मधूमेहाने होणाऱया मृत्यूंचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे.

अल्झायमरने 12 टक्के अधिक मृत्यू झाले आहेत. वर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठात सोसायटी अँड हेल्थचे संचालक एमिरेट्स स्टीवन वुल्फ यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. औषधांवर खर्च करावा का अन्न किंवा डोक्यावरील छत कायम ठेवण्यावर खर्च करावा असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला होता.

Related Stories

जगदविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत

tarunbharat

द्रव पृष्ठभागावर अनेक दिवस जिवंत राहतो विषाणू

Patil_p

पाऊस अन् हिमवृष्टीवर नियंत्रण मिळविणार चीन

Patil_p

सीमामार्गांनी देशाबाहेर पडण्याची तयारी

Patil_p

फ्रान्समध्ये निर्बंध

Omkar B

आलावी होणार इराकचे नवे पंतप्रधान

Patil_p
error: Content is protected !!