तरुण भारत

यंदाच्या गणतंत्र दिनाचे प्रमुख अतिथी बोरिस जॉन्सन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदाचा गणतंत्र दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भारताचे निमंत्रण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनी आमंत्रणाचा स्वीकार केल्याचे भारताला कळवले आहे. मंगळवारी राब यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची येथे भेट घेतली. राब हे सध्या भारताच्या दौऱयावर आले आहेत. गणतंत्र दिनी दिल्लीत होणाऱया प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित राहणारे जॉन्सन हे गेल्या 27 वर्षांमधील पहिलेच ब्रिटीश पंतप्रधान ठरतील. आतापर्यंत ब्रिटनच्या सहा उच्चपदस्थ माननीयांनी या सोहळय़ाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली आहे.

Advertisements

जॉन्सन यांनी भारताच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्यामुळे भारताने आनंद व्यक्त केला आहे. जॉन्सन यांच्या भारतभेटीमुळे आणि त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास मान्यता दिल्याने दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिकच दृढ होतील, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी व्यक्त केली. 1993 मध्ये जॉन मेजर यांनी गणतंत्र दिनी उपस्थिती दर्शविली होती. त्यापूर्वी 1956 मध्ये ब्रिटनचे अर्थविभाग प्रमुख रॅप बटलर, 1959 मध्ये राजपुत्र फिलिप, 1961 मध्ये महाराणी एलिझाबेथ (दुसऱया) आणि 1964 मध्ये ब्रिटनचे संरक्षण मंत्री माऊंटबॅटन यांनी गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली होती.

Related Stories

देहरादून : जनशताब्दी ट्रेनच्या धडकेने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू

Rohan_P

राम मंदिर ट्रस्टला मिळाले पहिले दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

prashant_c

चाचण्या वाढवण्याचे 13 राज्यांना निर्देश

Amit Kulkarni

देशातील शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने आखली योजना

datta jadhav

रानडुकरांना मारू देण्याची केरळची मागणी फेटाळली

Patil_p

बडगाममध्ये दहशतवादी कट उधळला

datta jadhav
error: Content is protected !!