तरुण भारत

पाकिस्तानात बलात्काऱ्याला नपुंसक बनवणारा कायदा

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानात बलात्काऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्यात आला असून, यापुढे अशा प्रकरणातील दोषींना नपुंसक बनवण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनकडून यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

Advertisements

पाक राष्ट्रपती भवनाच्या निवेदनानुसार, पाकिस्तानात नवीन कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर केली जाईल. त्यासाठी नवीन विशेष न्यायालय देखील तयार करण्यात येणार आहेत. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा तसेच त्यांना नपुंसक करण्याचाही कायद्यात समावेश आहे.

बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचे नॅशनल रजिस्टर तयार केले जाणार आहे. या कायद्यानुसार पीडितेची ओळख जाहीर केली जाणार नाही. तसेच पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून या प्रकरणांचा योग्य प्रकारे तपास झाला नाही तर त्यांना दंड आणि तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Related Stories

नववर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त

datta jadhav

त्सुनामीनंतर टोंगा देशाला मदतीचा ओघ सुरू

Patil_p

म्यानमारमध्ये लष्कराच्या गोळीबारात 18 आंदोलकांचा मृत्यू

datta jadhav

ईशान्येतील उग्रवादाला मोठा दणका

Patil_p

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम

Abhijeet Shinde

अफगाणिस्तान : मशिदीवरील आत्मघातकी हल्ल्यात 46 ठार

datta jadhav
error: Content is protected !!