तरुण भारत

कोरोनातून वाचणार का ?…चाचणी देणार उत्तर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

साऱया जगाला भीतीच्या गर्तेत लोटणाऱया कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न जगभरातील संशोधकांकडून होत आहे. लस आणि औषधे तयार करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले जात आहेत. त्यातच आणखी एका महत्वाच्या संशोधनाची भर पडली आहे. कोरोना झाल्यास संबंधित रूग्ण वाचण्याची शक्यता किती आहे, हे अचूकरित्या सांगणारे परीक्षण विकसीत केल्याचे प्रतिपादन ब्रिटीश संशोधकांनी केले आहे. या परीक्षणामुळे विशिष्ट रूग्णांवर अधिक प्रभावी उपचार करणे साध्य होणार असून अत्यवस्थ रूग्णांनाही याचा लाभ होणार आहे.

Advertisements

सध्या हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. मात्र लवकरच ते साऱयांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या रूग्णांची विशिष्ट प्रकारे रक्ततपासणी केली असता रूग्ण कोरोनातून बरा होण्याची शक्यता किती आहे याचे योग्य उत्तर मिळण्याची शक्यता या परीक्षणामुळे निर्माण झाली आहे. हे संशोधन लंडन येथील फ्रान्सिस क्लार्क संस्थेचे संशोधक आणि चॅरिट विद्यापीठाचे प्राध्यापक मार्पुस रायझर यांनी केल्याची माहिती देण्यात आली.

24 रूग्णांवर प्रयोग

आतापर्यंत या संशोधनाचे प्रयोग 24 गंभीररित्या आजारी कोरोना रूग्णांवर करण्यात आहेत. या 24 पैकी 19 रूग्ण वाचतील असे या परीक्षणातून समजले. तर 5 रूग्णांचा मृत्यू होईल, असेही अनुमान काढण्यात आले. या अनुमानानुसारच नेमके घडले. 19 रूग्ण वाचले तर 5 रूग्णांचा मृत्यू झाला.

प्रथिनांची गणना

या परीक्षणात कोरोना रूग्णाच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांची गणना केली जाते. या प्रथिनांचे प्रमाण रक्तात किती वाढले आहे, याची तपासणी केली जाते. अशी 27 प्रथिने शोधली गेली आहेत. या प्रथिनांचे रक्तातील प्रमाण रूग्णाला किती प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला आहे यावर अवलंबून असते. प्रथिनांचे प्रमाण वाढल्यास रूग्णाची स्थिती गंभीर होते असे दिसून आले आहे.

वाचण्यांमधून अनुमान याच प्रथिनांच्या प्रमाणावर रूग्ण वाचणार की त्याचा मृत्यू होणार याचे पुष्कळसे अचूक निदान करता येते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. रूग्णाला रूग्णालयात आणल्यापासून त्याच्या रक्तातील या प्रथिनांची चाचणी प्रतिदिन केली जाते. रूग्णाचा कोरोना बरा होत असेल तर प्रथिनांचे प्रमाण कमी कमी होत जाते. मात्र रूग्णाची स्थिती गंभीर होत गेल्यास प्रथिनांचे प्रमाणही वाढत जाते. प्रथिने वाढत जाणाऱया रूग्णांना वेळेवर प्रभावी उपचार देणे या परीक्षणांमुळे शक्य होणार असल्याचे संशोधक मार्पुस आयझर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत जाहीर

triratna

‘राष्ट्रीय बाल शक्ती’ने 32 मुलांचा गौरव

Patil_p

कोरोनाच्या संकटातून भारत उभारी घेईल !

Patil_p

16 जूनपासून खुली होणार स्मारके

Patil_p

बायोफोरकडून होणार फेविपिराविरची निर्मिती

Patil_p

भारत-चीनची लष्करी पातळीवरील चार तासांची चर्चा निष्फळ

datta jadhav
error: Content is protected !!