तरुण भारत

मेन्यूकार्डातून समजणार खाद्यपदार्थातील उष्माक

सरकारकडून नवा नियम लागू : हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना करावे लागणार पालन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक महत्त्वाचे पाऊल उचलत मेन्यू लेबलिंगचा नियम तयार केला आहे. या नियमाच्या अंतर्गत रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डात आता खाद्यपदार्थांमधील उष्माकांचा (कॅलरीज) उल्लेख अनिवार्य ठरला आहे. नव्या बदलामुळे खाद्यपदार्थांमधून किती प्रमाणात उष्मांक प्राप्त होणार हे समजणार आहे. याचबरोबर मेन्यू लेबलिंग करताना पोषक घटकांचे प्रमाणही नमूद करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात हा नियम मोठय़ा हॉटेलांसाठी ऐच्छिक असून जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने नवा लेबलिंग आणि डिस्प्ले रेग्युलेशन प्रसिद्ध केला आहे. यानुसार 10 पेक्षा अधिक शाखा असलेल्या रेस्टॉरंट्सवर हा नियम लागू होणार आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून दीर्घकाळापासून लेवलिंग रेग्युलेशन सुधारण्याचा प्रयत्न केला जात होता. ही सुधारणा आता अधिसूचित करण्यात आली आहे.

समाजात हॉटेलिंगचे प्रमाण वाढत असून मसालेदार, चमचमीत खाण्याने स्थुलपणा वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांकडून नोंदविण्यात येते. या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयने ही अधिसूचना काढली आहे. एखाद्या खाद्यपदार्थामुळे शरीराला किती प्रथिने, कर्बोदके, व्हिटामिन्स आणि फॅट्स मिळणार हे यामुळे कळणार आहे. 1998 ते 2015 या कालावधीत भारतातील स्थुल व्यक्तींचे प्रमाण दुप्पट झाले आहे, हे प्रमाण अडीच टक्क्यांवरून 5-6 टक्क्यांवर पोहोचले आहे.

साखळी हॉटेल्सवर बंधनकारक

एफएसएसएआयचा हा नवा नियम 10 हून अधिक साखळी हॉटेल्ससाठी जानेवारीपासून लागू होणार आहे. यानुसार केंदीय परवाना असलेल्या तसेच दहा किंवा त्याहून अधिक ठिकाणी रेस्टॉरंट चालविणाऱया कंपन्यांना याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या हॉटेल्सना आता स्वतःच्या मेन्यूकार्डमध्ये उष्माकांसंबंधी माहिती द्यावी लागणार आहे. याचबरोबर मेन्यूकार्डमध्ये उष्माकांचे किती प्रमाण कुठल्या व्यक्तीसाठी पुरेसे आहे हेही नमूद करावे लागणार आहे.

केंद्र सरकारच्या या अधिसूचनेनुसार मेन्यूकार्ड, डिस्प्ले बोर्ड किंवा बुकलेटमध्ये खाद्यपदार्थांसह त्याचे पोषणमूल्यही नमूद करावे लागणार आहे. पिझ्झा, बर्गरविक्री करणाऱया कंपन्या म्हणजेच पिझ्झा हट, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड इत्यादींना स्वतःच्या खाद्यपदार्थांसह त्यातील उष्माकांची माहिती द्यावी लागणार आहे. याचबरोबर हॉटेल आणि मोठय़ा रेस्टॉरंटला स्वतःच्या मेन्यूकार्डातील खाद्यपदार्थांमध्ये किती उष्मांक आहेत हे सांगावे लागणार आहे.

100 ग्रॅमचा बर्गर, 295 उष्मांक

एका 100 ग्रॅमच्या पिझ्झामध्ये 260 उष्मांक असतात, तर 100 ग्रॅमच्या बर्गरमध्ये 295 उष्मांक असतात. एका सरासरी प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन 2000 उष्माकांची गरज भासते. कामाच्या स्वरुपानुसार लोकांची उष्माकांची गरज वेगवेगळी असू शकते. अशाप्रकारे प्रत्येक खाद्यपदार्थावर त्याचे पोषणमूल्य नमूद असल्यास किती उष्मांक प्राप्त होतील हे संबंधितांना समजणार आहे.

Related Stories

पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांचा युएईत ‘बार’

Patil_p

राज्यात 515 नव्या कोरोनाबाधितांची भर

Patil_p

मध्यप्रदेशात काँग्रेस आमदाराचा भाजप प्रवेश

Patil_p

यंदाचा नोव्हेंबर १४२ वर्षांच्या इतिहासात चौथा सर्वाधिक उष्ण महिना

Sumit Tambekar

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात आढळला ड्रोन

datta jadhav

सामूहिक बलात्कार : दोषींना 20 वर्षांची कैद

Patil_p
error: Content is protected !!