तरुण भारत

अर्थवर्धिनी पतसंस्थेकडून १०% लाभांश जाहीर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / लातूर

अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेकडून सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे अशी माहिती पतसंस्था अध्यक्षा अभियंता गीता ठोंबरे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावार सचिव संपदा दाते, उपाध्यक्षा डॉ. माधवी निरगुडे उपस्थित होत्या.

Advertisements

कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वसाधारण सभा घेता आली नसली तरी त्याऐवजी संचालक मंडळाची बैठक घेऊन वर्षभराचा आढावा घेण्यात आला.पतसंस्थेला 2019-20 या आर्थिक वर्षात रू 19.38 लाख एवढा नफा झाला असुन सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप होणार असल्याचे जाहीर केले. संस्थेची 142.2 कोटी एवढी आर्थिक उलाढाल झाली आहे. 6 व्या वर्षात संस्था 15 कोटी ठेवीकडे वाटचाल करत आहे. संस्थेला नौकरदार,व्यावसायिक व हितचिंतक यांचे मोठे सहकार्य लाभले असून, संस्थेने ठेवीवर आकर्षक व्याजदार, विविध कर्ज योजना,संपूर्ण संगणकीकृत सुसज्ज कार्यालय, विनम्र सेवेच्या बळावर दमदार वाटचाल चालु ठेवली आहे. संस्था सतत नफ्यात असुन सतत वर्ग अ प्राप्त आहे. संपूर्ण आधुनिकतेचा स्वीकार करून संस्था सभासद, ठेवीदार व कर्जदार यांना उत्तम सेवा देत आहे.भविष्यातही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण सेवा देण्याचा संकल्प अध्यक्षा अभियंता गीता ठोंबरे यांनी व्यक्त केला.

सामाजिक उपक्रमाच्या बाबतीतही संस्था कायम अग्रभागी असते नुकतेच संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सर रूग्णासाठींच्या रूग्णसेवा सदन इमारतीसाठी रू 5 लाखाचा निधी वितरीत केला आहे. प्रस्ताविक व अहवाल वाचन संजय कुलकर्णी यांनी केले,सुत्र संचलन व आभार प्रदर्शन संपदा भालेकर यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक मंडळातील अंजली कुलकर्णी,पुजा कांबळे,स्मिता अयाचित, अनुपमा पाटील,निलीमा अयाचित,रोहिनी मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Stories

बार्शीत जिल्हाधिकारी यांचा घरपोच गॅसचा आदेश वाऱ्यावर

Abhijeet Shinde

सोलापूर : 1100 पैकी 994 जणांनी घेतली लस

Abhijeet Shinde

200 जेष्ठ नागरिकांना मिळाले एस.टी. महामंडळाचे स्मार्ट कार्ड

prashant_c

सोलापूर : तडवळेतील भगवतीदेवीच्या नवरात्रोत्सवास १७ ऑक्टोबर पासून प्रारंभ

Abhijeet Shinde

जलयुक्तची खुशाल चौकशी करावी : फडणवीस

Abhijeet Shinde

सोलापूर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रिडा मार्गदर्शक, क्रिडा पत्रकारांचा सन्मान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!