तरुण भारत

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी ओलांडला 18.80 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 4, 304 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 80 हजार 893 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 434 एवढा आहे. 

Advertisements


कालच्या एका दिवसात 4,678 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 69 हजार 897 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 61 हजार 454 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.01 % आहे. मृत्यू दर 2.58 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 18 लाख 71 हजार 449 नमुन्यांपैकी 18 लाख 80 हजार 893 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 09 हजार 478 क्वारंटाईनमध्ये असून, 3 हजार 993 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

”गुजरातला मदत केल्याचे दु:ख नाही पण कधीतरी पंतप्रधानांचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल”

Abhijeet Shinde

‘यंत्रमाग व्यवसायाला व्याज सवलत देण्याचे सहकार बँकांना आदेश द्यावे’

Abhijeet Shinde

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये: मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

Abhijeet Shinde

पुण्यात विजबिलांची थकबाकी 1 हजार कोटींवर

Rohan_P

सांगली : कवलापुरच्या जमिनीची किरीट सोमय्या यांनी केली पाहणी; पोलिसांची तारांबळ

Abhijeet Shinde

जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विश्वास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!