तरुण भारत

एक व्यक्ती खोकली तरी…

अरूंद कॉरिडॉर किंवा पॅसेजमध्ये एक कोरोनाबाधित व्यक्ती खोकली तरी तिच्या पुढे आणि मागे कोरोना विषाणू असलेल्या थेंबांची एक रांगच निर्माण होते. ज्या प्रमाणे पाणी कापत नौका पुढे जात असताना मागे पाण्याची एक रेष उमटलेली दिसून येते त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्ती खोकत किंवा शिंकत जात असताना तिच्या मागे कोरोना विषाणूयुक्त सूक्ष्म नस्यद्रवथेंबांची रांग तयार होते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या मागून चालणाऱया व्यक्तींच्या थेट नाकात हे कोरोनायुक्त थेंब श्वासावाटे जातात. या थेंबांमध्ये कोटय़वधी विषाणू असू शकतात. त्यामुळे गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी खोकू नये. खोकताना तोंड पूर्णपणे हाताने किंवा रूमालाने झाकावे. पूर्ण तोंड आणि नाक झाकले जाईल असे चांगल्याप्रकारचे मुखावरण (मास्क) उपयोगात आणावा, अशा अनेक सूचना आहेत.

Related Stories

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

datta jadhav

अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार : 4 ठार

Patil_p

कोरोना लसीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नाही

datta jadhav

नासाच्या दोन अंतराळवीरांसह ‘Space X’ रॉकेटचे अवकाशात यशस्वी उड्डाण

datta jadhav

जगभरातील बाधितांचा आकडा 9 कोटींसमीप

datta jadhav

आशिष मिश्रा मुख्य आरोपी

Patil_p
error: Content is protected !!