तरुण भारत

नोकीया 5.4 बाजारात दाखल

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने नोकीया 5.4 हा आपला नवा स्मार्टफोन जागतिक स्तरावर नुकताच लाँच झाल्याची घोषणा केली आहे. क्वाड रियर कॅमेरा हे या फोनचे वैशिष्टय़ आहे. 15 हजाराच्या आसपास या फोनची किंमत असून रियलमी नार्झो 20 प्रो व रेडमी नोट 9 प्रो या फोन्सला टक्कर देणार आहे. 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसह हे फोन सादर केले आहेत. 48 मेगा पिक्सलचा कॅमेरा, यात डय़ूअल सीम असून ज्यात अँड्रॉइड 10 ऑपेरेटींग सिस्टम अँड्रॉइड 11 मध्ये रुपांतरित करण्याची सोय आहे. सदरचा नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लाँचिंग करण्याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही.

Related Stories

धनत्रयोदशीला 40 टन सोने विक्री

Patil_p

पूर्वांकाराचा मुंबईत अल्ट्रा लक्झरी प्रकल्प

Patil_p

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

Patil_p

व्होडाफोन-आयडियाकडून 3,354 कोटी अदा

tarunbharat

उत्सवासाठी ‘एलजी’कडून नवे टीव्ही बाजारात

Omkar B

रेडमी नोट टेन येणार पुढच्या महिन्यात

Patil_p
error: Content is protected !!