तरुण भारत

टाकाऊ वस्तूंपासून तरुणांनी बनविले विमान

लॉकडाऊन काळात ज्ञानाचा केला पुरेपूर वापर : बेळगाव परिसरात विमान ठरतेय चर्चेचा विषय

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगावच्या विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचा वापर करून टाकाऊ वस्तूंपासून लहान विमानाची निर्मिती केली आहे. एअरोनॉटीकल्स इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱया या विद्यार्थ्याने घरामध्ये उपलब्ध असणाऱया वस्तुंपासून हे विमान तयार केले आहे. खऱयाखुऱया विमानाप्रमाणे 5 फुटाचे विमान बनविले असून, आपल्या ज्ञानाचा लॉकडाऊन काळात या विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे हे विमान सध्या बेळगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

 गणपत गल्ली येथील बाळेश शेखर हलगी व कंग्राळ गल्ली येथील शुभम शिवाजीराव गौंडाडकर या दोन विद्यार्थ्यांनी हे अनोखे विमान तयार केले आहे. हे दोघेही जीआयटी कॉलेजचे विद्यार्थी असून, लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद असल्याने त्यांनी घरी उपलब्ध असणाऱया वस्तुंपासून विमान तयार केले. इंजिनियरिंगचे शिक्षण घेता घेता आपण घेतलेल्या शिक्षणाचा वापर व्हावा या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. यासाठी सात महिने मेहनतही घेतली. अनेक वेळा प्रयोग चुकले, परंतु त्यांनी अखेर हे विमान तयार करण्यात यश मिळविले.

वापरात नसलेल्या वस्तुंपासून बनविले विमान

या दोघांनी घरातील वापरात नसलेल्या वस्तुंपासून विमान बनविले आहे. यासाठी त्यांनी प्लास्टिकचे पाईप, विमानाच्या समोरील भागासाठी फॅनचा भाग, स्पेचे कॅन, खराब झालेले फोम, घडय़ाळातील मशीन, खेळण्यातील जेसीबीचा रिमोट, मिक्सरचे जार यासह इतर साहित्याचा वापर करून या तरुणांनी विमान तयार केले आहे. यामध्ये त्यांना त्यांचे आई-वडील व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

असे आहे विमान

अंदाजे 15 ते 20 किलो वजन, साडेचार फूट रुंद व पाच फूट लांब आकाराचे विमान आहे. ज्यावेळी विमान लँडिंग करते त्यावेळी ज्या प्रकारे त्याची चाके आपोआप बाहेर येतात त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनी लँडिंग गियरची संकल्पना मांडली आहे. त्यामध्ये हिरवे, पिवळे लाईट बसविल्याने दुरून पाहिल्यास खरेखुरे विमान आहे का, असा भास होतो.

Related Stories

मराठी भाषिक अपमान सहन करणार नाहीत!

Amit Kulkarni

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पोलीस लागले कामाला

Patil_p

गोकाकच्या नगराध्यक्षपदी जयानंद हुनश्याळ

Patil_p

कित्तूर उत्सव साधेपणाने

Rohan_P

एनसीसीच्यावतीने रक्तदान शिबिर

Omkar B

अंमली पदार्थ विरोधात अभाविपची सहय़ांची मोहिम

Rohan_P
error: Content is protected !!