तरुण भारत

वीस वर्षांपासून गोंधळाची परंपरा टिकविण्याचा प्रयत्न

वडगाव मंगाईनगर दुसरा क्रॉस येथे वैयक्तिक देवीचा गोंधळ :

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

‘लख्ख पडला प्रकाश दिवटय़ा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा’ हे गाणे ऐकल्यावर सर्वांना गोंधळय़ाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी लग्न समारंभ यासह मंगलकार्यात गोंधळींना बोलावून देवीचा जागर करण्यात येत असे. आजही ही परंपरा टिकवून ठेऊन आनंद व्ही. गोंधळी हे गेल्या वीस वर्षांपासून प्रत्येकी तीन वर्षांनी वडगाव मंगाईनगर दुसरा क्रॉस येथे वैयक्तिक देवीचा गोंधळ करीत आहेत.

 तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुकादेवी या कुलदेवतांच्या नावाने गोंधळ घालण्याचा विधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रचलित आहे. पण सध्या विवाह नोंदणी, साधेपणाने उरकण्यात येणारे विवाह सोहळे, स्वागत समारंभ यामध्ये पूर्वीपासून चालत आलेला गोंधळ लुप्त होत चालला आहे. मात्र आपल्या परंपरेत खंड पडू न देता अनेक जण घरातील मंगल कार्याआधी देवीचा जागर करून गोंधळ घालतात. मुख्यतः गोंधळ हा गोंधळी समाजाच्यावतीने करण्यात येतो. हाच देवीचा गोंधळ बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी वडगाव येथे पार पडला.

  घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा विधी असतो. महाराष्ट्रात मराठय़ांमध्ये व देशस्थ ब्राह्मणांमध्ये हा विधी प्रचलित आहे. गोंधळी जातीचे लोक यजमानांच्या सांगण्यावरून गोंधळ घालण्याचा विधी पार पाडतात. गोंधळ घालण्यात कमीत कमी चारजण भाग घेतात. साथीसाठी व तुणतुणे वाजविण्यासाठी प्रत्येकी एक, गीत व कथा निरुपण करणारा एक मुख्य गोंधळी आणि अधूनमधून लोकांना हसविणारा त्यांचा एक साहाय्यक यामध्ये असतो. गोंधळ हा रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत करण्यात येतो. यावेळी देवीचा जागर, जोगवा, देवीचे गुणगान दिवटी कशी खेळविली जाते, याबद्दल गाण्याच्या माध्यमातून माहिती देऊन रात्रभर जागरण करून हा गोंधळ मांडण्यात येतो. सकाळी 6 वाजता काकडारती करून या गोंधळाची समाप्ती करण्यात येते.   

असा करतात गोंधळ

 पूर्वी गोंधळय़ांच्या अंगात मलमलीचे अंगरखे, गळय़ात कवडय़ांच्या माळा व डोक्मयावर कंगणीदार पगडय़ा असत. एका पाटावर नवे वस्त्र ठेवून गोंधळी त्यावर कलशादी वस्तूंची विधिपूर्वक मांडणी करतो व गोंधळ बोलावणाऱया यजमानांच्या हस्ते देवीची प्रति÷ापना व पूजा करतो. गोंधळासाठी आवश्यक असलेली ‘बुधली’ व गोंधळ ‘दिवटी’ या वस्तू गोंधळी स्वतःच्या घरूनच आणतो. मुख्य गोंधळी गण म्हणून जगदंबेचे स्तवन करतो व नंतर अनेक देवतांची नावे घेऊन ‘गोंधळासी यावे’ असे आवाहन करतो. नंतर तो पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागांत देवीचे गुणगान व एखादे संगीत आख्यान सांगतो. देवीच्या आरतीने गोंधळ संपतो. गोंधळात म्हटली जाणारी पदे, कथा गीते व कथा या लोकसाहित्यातीलच असतात. मीठ-मिरचीचे भांडण, मांगिणीचे शिर, कोल्हय़ाचे लगीन इ. आख्याने व कथा त्यात प्रमुख असतात.

  दर 3 वर्षांनी हा गोंधळ मोठय़ा प्रमाणात आयोजित करण्यात येतो. तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते. मात्र यावषी कोरोनाचे संकट असल्याने हा गोंधळ मोजक्मया जणांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. बुधवारी दुपारी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

आजच्या पिढीला गोंधळाची माहिती होणे गरजेचे

 शिवाजी महाराजांच्या काळात गोंधळींना मानसन्मान दिला जात होता. त्यामुळे आजही गोंधळी समाज अस्तित्वात आहे. आमच्या वाडवडिलांपासून आम्ही गोंधळाचे कार्य सुरू ठेवले आहे. मात्र, आताच्या पिढीला गोंधळ काय असतो हेच माहिती नाही. त्यामुळे गोंधळ काय असतो, का केला जातो याबद्दल माहिती आजच्या पिढीला होणे गरजेचे असल्याचे मत कृष्णा माने यांनी व्यक्त केले.

कृष्णा माने

 दर तीन वर्षांनी गोंधळाचे आमंत्रण

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गोंधळाची परंपरा आहे, त्याप्रमाणे कर्नाटकात नाही. दर तीन वर्षांनी आनंद गोंधळी हे आम्हाला गोंधळ करण्यासाठी आमंत्रित करतात. रात्री 10 वाजता सुरू झालेला गोंधळ सकाळी 6 वाजता संपतो. यामध्ये देवीचा जागर यासह देवीचा कट्टा याबद्दल माहिती भक्तांना सांगण्यात येते. दिवटी पेटवून खेळ खेळण्यात येतो.

 – गणेश दत्ता गोंधळी

Related Stories

धारकऱयांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे

Patil_p

अनधिकृत कटआऊट्सकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

गणोत्सव आज होणार झी म्युझिक मराठीवर प्रदर्शित

Patil_p

विद्यार्थ्यांना यापुढे लॅपटॉपऐवजी टॅब देण्याचा सरकारचा विचार

Patil_p

विकेंड कर्फ्यूची काटेकोर अंमलबजावणी

Patil_p

बेळगाव-नागपूर विमानसेवा लवकरच

Patil_p
error: Content is protected !!